esakal | नाशिक : ग्रामीण भागात वाढतोय कोरोना; १२९ पैकी ८३ बाधित ग्रामीणमधील
sakal

बोलून बातमी शोधा

nashik corona update

नाशिक जिल्ह्यातील १२९ पैकी ८३ कोरोना बाधित ग्रामीणमधील

sakal_logo
By
अरुण मलाणी

नाशिक : जिल्‍ह्यातील ग्रामीण भागात कोरोना पुन्‍हा डोके वर काढत असल्‍याचे आकडेवारीतून आढळून येत आहे. सोमवारी (ता. ६) जिल्‍ह्यात १२९ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. पैकी तब्‍बल ८३ बाधित नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहेत. १३४ रुग्‍णांनी दिवसभरात कोरोनावर मात केली, तर एका बाधिताचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्यात ९४० बाधितांवर उपचार सुरू आहेत.


सोमवारी नाशिक ग्रामीण क्षेत्रातील ८३, तर नाशिक शहरातील ३७ रुग्‍णांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात म्‍हटले आहे. मालेगावला पाच, तर जिल्‍हाबाहेरील चार रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. जिल्‍ह्यात दिवसभरात एका बाधिताच्‍या मृत्‍यूची नोंद असून, हा मृत रुग्‍ण नाशिक ग्रामीण क्षेत्रातील आहे. १३४ रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याने ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येत सहाने घट झाली आहे.

हेही वाचा: भोंदुबाबांने लुटलेले पैसे परत मिळाले; पण गेले कुणाच्या खिशात?


सायंकाळी उशिरापर्यंत जिल्‍ह्यातील ७३८ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. यापैकी ३२२ प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणमधील असून, २२८ मालेगाव, तर नाशिक शहरातील १८८ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ४०९ रुग्‍ण दाखल झाले. यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील ३९५ रुग्‍णांचा समावेश आहे. जिल्‍हा रुग्‍णालयात चार, तर डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात एक रुग्‍ण दाखल झाला. नाशिक ग्रामीणमधील नऊ रुग्‍णांचा समावेश आहे.

हेही वाचा: PHOTOS : बैलाच्या पाठीवर रंगले राजकारणाचे प्रतिबिंब

loading image
go to top