Nashik MVP 11th Admission : मविप्रच्या ग्रामीण महाविद्यालयांची या तारखेला अकरावीची पहिली यादी

11th admissions process
11th admissions processesakal

Nashik MVP 11th Admission : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक महापालिका क्षेत्र वगळता उर्वरित जिल्हाभरातील ग्रामीण भागात असलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते आहे.

या संदर्भात संस्थेतर्फे प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार पहिली निवड यादी २१ जूनला प्रसिद्ध केली जाणार आहे. (11th admission process first selection list of mvp released on June 21 nashik news)

मविप्र संस्थेतर्फे यापूर्वीच नाशिक ग्रामीण क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठीचे मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या होत्या. यानंतर गुरुवारी प्रवेश फेऱ्यांची वेळापत्रक संस्थेने प्रसिद्ध केले आहे.

त्यानुसार ऑनलाइन मेरिट फॉर्म भरण्यासाठी संकेतस्थळावरील लिंक ४ जून पासून सक्रिय झालेली आहे.ऑनलाइन भरलेला मेरीट फॉर्म पडताळणी, दुरुस्ती करण्यासाठी १५ ते १८ जून अशी मुदत दिली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

11th admissions process
11th Admission : अकरावी प्रवेश अर्ज भरण्यास अडचणी; नोंदणी शुल्कांचे ऑनलाइन पैसे भरताना एरर

विभागनिहाय भरलेला फॉर्म दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर दाखविण्यात येतील. व दुरुस्तीसाठी १९, २० जून अशी मुदत असणार आहे.

प्रथम गुणवत्ता यादी २१ जून ला दुपारी चार वाजता जाहीर होईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २२ ते २४ जून मुदत दिली जाईल. दुसरी गुणवत्ता यादी २६ जूनला प्रसिद्ध होणार असून प्रवेशासाठी २७ जूनपर्यंत संधी दिली जाईल. तिसरी यादी २८ जूनला जाहीर होऊन प्रवेशासाठी ३० जून पर्यंत मुदत असेल.

11th admissions process
Nashik 11th Admission : या वर्षी अकरावीच्या 26 हजार 720 जागा; सतराशेंनी भरला भाग दोन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com