Admission Process
sakal
नामपूर: दहावीचा निकाल लागून महिने उलटले तरी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अनेक अडथळ्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. सप्टेंबर महिना सुरू झाल्यानंतरही राज्यात तब्बल आठ लाखांहून अधिक जागा रिक्त असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया तत्काळ बंद करून पारंपरिक पद्धतीने प्रवेश द्यावेत, अशी मागणी पालक व कनिष्ठ महाविद्यालय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.