Nashik Crime: मालेगावला 120 किलो हरणांचे मांस अन् बंदूक जप्त; मुद्देमाल जप्त, 5 जणांविरुद्ध गुन्हा

crime
crime esakal

Nashik Crime : येथील दरेगाव शिवारात सुन्नीया हन्पीया मदरसा जवळील अमिन गोल्डन याच्या फार्महाऊसमध्ये हरणांचे मांस कापणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून तीन मादी व तीन नर अशा सहा हरणांचे १२० किलो मांस,गावठी बंदूक असा ऐवज जप्त केला.

या प्रकारामुळे शहरात खळबळ उडाली आहे. पवारवाडी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (120 kg deer meat and gun seized from Malegaon Material seized case against 5 persons Nashik Crime news)

अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, सहाय्यक पोलिस अधीक्षक तेगबीरसिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना तालुक्यातील दरेगाव शिवारात हरणाची कत्तल केली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

त्यानुसार त्यांच्या सहकाऱ्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी जावेद खाटीक व वन विभागाचे कांतिलाल वाळके व अतुल देवरे यांना बरोबर घेत अमीन गोल्डन याच्या फार्महाऊसवर छापा घातला. या ठिकाणी पथकाला हरणांचे मांस मिळून आले.

पोलिसांनी शेख शब्बीर शेख रज्जाक ऊर्फ आला (वय ४५, रा. कमालपुरा), शौकत हुसेन निसार अहमद (वय ४४, मोमीनपुरा) व दानिश शेख अश्पाक (वय २२, रा. आयेशानगर) या तिघांना घटनास्थळी ताब्यात घेतले. तीन मादी व तीन नर अशा सहा हरणांचे मांस आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

crime
Crime news : जालन्यात तीन हातभट्ट्या उद्ध्वस्त

फार्महाऊस मोहंमद आमीन मोहंमद हारून अन्सारी (रा. कमालपुरा) यांच्या मालकीचे तसेच हरणे हे मुदस्सीर अकिल अहमद (रा. बेलबाग) याने आणून दिल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी फार्म हाऊसमधून एकूण १२० किलो मांस, १ गावठी बनावटीची पिस्तूल, १ जिवंत काडतूस, लोखंडी कोयता, विना नंबरची दुचाकी असा एकूण २ लाख ५२ हजार १०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

निरीक्षक पाटील, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, हवालदार सचिन धारणकर, राकेश उबाळे, विनायक जगताप, पोलिस नाईक सचिन गोसावी, संतोष सांगळे, भरत गांगुर्डे, नवनाथ शेलार, उमेश खैरनार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

फार्म हाऊस मालक मोहंमद आमीन व हरणे आणून देणारा मुदस्सीर अकिल हे दोघे फरार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर हरणे आली कशी? शहरात हरणांचे मांस कोण विक्री करतो? किती दिवसापासून हे प्रकार सुरु आहेत. हरणांची शिकार कोठे केली जाते? आदी प्रश्‍नांची उत्तरे पोलिस तपासात उघड होणार आहेत.

crime
Solapur Crime : हवेत गोळीबार करून जीवे मारण्याची धमकी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com