Nashik News: वीजेच्या धक्क्याने 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

Ansari Mohammad Umrain
Ansari Mohammad Umrainesakal

Nashik News : येथील गुलशेर नगर भागातील अन्सारी मोहम्मद उमरेन रिझवान अहमद (१३) या मुलाला विजेचा धक्का लागून त्याचा मृत्यू झाला. मामा राशीद अन्सारी यांच्या घराचे सुरू असलेले काम पाहण्यासाठी उमरेन छतावर चढला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यावेळी त्याला अचानक विजेचा धक्का लागून तो गंभीर जखमी झाला. वडील रिझवान अहमद यांनी उमरेनला तत्काळ सामान्य रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

राशीद यांच्या घरावरून ११ हजार के.व्ही क्षमतेची तार गेली आहे. काही तारा लोंबकळल्या आहेत. या तारेचाच धक्का लागल्याने उमरेनचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. घटनेमुळे गुलशेरनगर भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. पवारवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

जनता दलाचा आंदोलनाचा इशारा

शहरातील गुलशेरनगर भागात १३ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. वीज कंपनीच्या खासगी ठेकेदाराच्या गलथान कारभार याला जबाबदार आहे. गुलशेरनगर भागात ११ हजार केव्ही क्षमेतेची विजेची मुख्य वाहिनी गेली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Ansari Mohammad Umrain
Dada Bhuse : महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी : दादा भुसे

अनेक ठिकाणी तारा लोंबकळत असतात. या भागात लाकडी फळ्यांची घरे आहेत. काही घरे दुमजली आहेत. या घरांवरुन ११ हजार केव्हीची मुख्य वीजवाहिनी गेल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

खासगी वीज वितरण कंपनी शासनासोबत केलेल्या कराराचे सतत उल्लंघन करत आहे. कंपनीने शहरातील सर्व वीज तारा बदलून कोटीन असलेल्या तारा बसवाव्यात. जेणेकरुन शहरात दुर्घटना घडणार नाहीत. मागण्यावर कार्यवाही न झाल्यास आठ दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा जनता दलातर्फे पक्षाचे सरचिटणीस मुश्‍तकीम डिग्नीटी यांनी दिला आहे.

Ansari Mohammad Umrain
Nashik: 1 अधिकाऱ्यावर 7 बिटांचा अतिरिक्त पदभार! बागलाण तालुक्यात शिक्षकांना वर्ग सांभाळून कारभार पाहण्याची वेळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com