Dengue Disease : ऑक्टोबरमध्ये तब्बल 140 नवीन डेंगी रुग्ण! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dengue News

Dengue Disease : ऑक्टोबरमध्ये तब्बल 140 नवीन डेंगी रुग्ण!

नाशिक : पावसाळा संपल्यानंतर आता डेंगीची भीती निर्माण झाली असून, ऑक्टोबर महिन्यात तब्बल १४० नवीन रुग्ण आढळले आहेत. महापालिकेचा खासगी रुग्णालयात डेंगी रुग्ण मोठ्या प्रमाणात उपचार घेत आहेत. (140 new dengue patients in October Nashik News)

हेही वाचा: Nashik : बाजार समितीत हवाय उच्च दर्जाचा ‘तिसरा डोळा’!

यंदा पावसाळा लांबला. त्यामुळे साथीच्या आजारांचा मुक्कामदेखील वाढला होता. आता पावसाळा संपत नाही, तोच डेंगीच्या आजाराने तोंड वर काढले आहे. ऑक्टोबर महिन्यात १४० नवीन डेंगीचे रुग्ण आढळून आले. महापालिकेकडून डेंगी रुग्णांची माहिती खासगी रुग्णालयांना कळविणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे सदर आकडेवारी अधिक असल्याचे दिसून येते असा दावा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून केला जात आहे.

मागील तीन महिन्याचा विचार केल्यास ऑगस्ट महिन्यामध्ये डेंगीचे ९९ रुग्ण होते. सप्टेंबर महिन्यात १३९ पर्यंत, तर ऑक्टोबर महिन्यात तब्बल १४० डेंगीबाधित रुग्ण आढळून आले. डेंगी पाठोपाठ चिकूनगुनियाचे २८ रुग्ण आढळले आहेत. तापसदृश्य आजाराचे २७३५ रुग्ण, तर स्वाइन फ्लूचे १४८ रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा: Nashik Crime News : शहर परिसरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ