Nashik News: जिल्ह्यात कमी पटसंख्या असलेल्या 142 शाळा; सिन्नर व येवला तालुक्यातील शाळा सर्वाधिक

school
schoolesakal

Nashik News : शाळेतील कमी पटसंख्या, त्यामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात येणाऱ्या अडचणी, कमी पटसंख्येमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक भावना निर्माण न होणे अशी कारणे देत राज्य सरकारने २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा समूह शाळांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने सर्वेक्षण करून प्राप्त झालेल्या माहितीतून नाशिक जिल्ह्यात ० ते २० पटसंख्या असलेल्या १४२ शाळा आहेत. यात येवल्यात ३०, तर सिन्नरमध्ये ३१ शाळा आहेत. (142 schools with low number of students in district nashik news)

ऑक्टोबरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कमी पटसंख्येच्या शाळा बंद करून, समूह शाळा निर्माण करण्याची प्रक्रिया राबविण्याचा निर्णय झाला होता. शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यात १ ते २० पटसंख्येच्या १४ हजार ७८३ शाळा आहेत. त्यात एक लाख ८५ हजार ४६७ विद्यार्थी, तर २९ हजार ७०७ शिक्षक आहेत.

या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांनी समूह शाळा विकसित करण्याचे आदेश दिले. या पत्राच्या अनुषंगाने समूह शाळा चाचपणीसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातून कमी पटसंख्या असलेल्या शाळांची माहिती मागविली.

शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी फिल्डवर उतरत, बैठका घेत माहिती घेतली. या माहितीत जिल्हाभरात १४२ शाळांमध्ये ० ते २० पटसंख्या असल्याचे निदर्शनास आले. यातील बहुतांश शाळांमध्ये ११ ते १९ दरम्यान विद्यार्थ्यांची संख्या आहे; तर १० शाळांमध्ये एक आकडी विद्यार्थ्यांची संख्या आहे.

school
Nashik News: अखेर 18.22 कोटींचा जिल्हा टंचाई कृती आरखडा सादर; जिल्हा प्रशासनाकडून मान्यतेची प्रतीक्षा

समूह शाळा करण्याचा निर्णय झाल्यावर शिक्षक संघटनांसह विरोकांकडून टीकास्त्र झाले. हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याचे (आरटीई) उल्लंघन करणारा आहे. समूह शाळेमुळे विद्यार्थ्याना त्यांच्या घरापासून एक किंवा तीन किलोमीटरच्या आत शाळा उपलब्ध होणार नाही.

त्यामुळे या निर्णयावर शिक्षण क्षेत्रातून टीका झाली. त्यामुळे २० पटसंख्या असलेल्या शाळांची संख्या निश्चित झालेली असली, तरी पुढील कार्यवाहीबाबत शासनस्तरावरून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे पुढील कोणतीही प्रक्रिया झालेली नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

तालुकानिहाय शाळांची संख्या

चांदवड (१२), देवळा (१५), इगतपुरी (१९), नांदगाव (२५), निफाड (९), सिन्नर (३०) व येवला (३१).

school
New Voter Registration: नवमतदारांची 80 टक्के ऑनलाइन नोंदणी; वर्षभरात 59 हजार मतदार वाढले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com