Nashik News: अखेर 18.22 कोटींचा जिल्हा टंचाई कृती आरखडा सादर; जिल्हा प्रशासनाकडून मान्यतेची प्रतीक्षा

 Water scarcity
Water scarcityesakal

Nashik News : नोव्हेंबर संपत आलेला असतानाही जिल्ह्याचा टंचाई कृती आराखडा तयार नसल्याची बाब ‘सकाळ’ने निदर्शनास आणल्यावर अखेर मंगळवारी (ता. २८) जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १८.२२ कोटींचा टंचाई कृती आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आराखड्यात तब्बल १० कोटींनी वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेने आराखडा सादर केल्यावर आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मान्यतेची प्रतीक्षा आहे. (18.22 crore district shortage action plan submitted nashik news)

गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा चांगला पाऊस झाला होता. धरणे ओव्हरफ्लो होती, त्यामुळे टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी असल्याने टंचाईच्या झळा लागल्या नाहीत. मात्र, मार्च ते जून २०२३ या टप्प्यात टंचाई मोठी जाणवली. या अखेरच्या टप्प्यात जिल्ह्यातील टॅंकरची संख्याही १७० वर पोहोचली होती. यंदा सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने टंचाईच्या झळा ऑगस्ट- सप्टेंबरपासून जाणवू लागल्याने ऐन पावसाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झालेला आहे.

साधारणः १५ ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पावसाचा अंदाज घेऊन दरवर्षी टंचाई कृती आराखडा तयार केला जातो. यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून तालुकानिहाय आराखडे मागविले होते. मात्र, तालुकास्तरावरून आराखडा प्राप्त होत नसल्याने टंचाई कृती आराखडा रखडला होता. याबाबत ‘सकाळ’ने टंचाई कृती आराखडा रखडला असल्याबाबतचे वृत्त दिले होते.

सदर वृत्त प्रसिद्ध झाल्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी तातडीने लक्ष घालत, बैठक घेत तालुक्यांचे आराखडे मागवून घेत १८.२२ कोटींचा टंचाई कृती आराखडा अंतिम केला.

 Water scarcity
Jalgaon Unseasonal Rain: भडगावातील 154 हेक्टवरील पीक जमीनदोस्त; अवकाळीसह गारपिटीचा फटका

आराखड्यात ७८७ गावे आणि एक हजार ३७५ वाड्या अशा एकूण दोन हजार १६२ गाव-वाड्यांसाठी ३५४ टॅंकरची आवश्यकता भासणार आहे. यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १३ कोटी खर्च अपेक्षित आहे. याशिवाय विंधन विहीर घेणे, तात्पुरत्या नळपुरवठा योजनांची दुरुस्ती, विहीर खोलीकरण आदी उपाययोजना घेण्यात आल्या आहेत.

आराखड्यातील उपाययोजना (अपेक्षित खर्च)

उपाययोजना अपेक्षित खर्च

प्रगतीतील नळ योजना पूर्ण करणे -

विंधन विहीर घेणे १ कोटी ३३ लाख

ना. पा. पु. योजना विशेष दुरुस्त्या ३५ लाख

तात्पुरत्या न. पा. योजना घेणे ७ लाख

विहिरी खोल करणे ३५ लाख

खासगी विहिरी अधिग्रहण करणे २ कोटी ६५ लाख

टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करणे १३ कोटी ४६ लाख

 Water scarcity
Unseasonal Rain Damage: अवकाळीग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजचा प्रस्ताव : मंत्री अनिल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com