esakal | नामपूरला १५ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक
sakal

बोलून बातमी शोधा

Onion

नामपूरला १५ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक

sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : येथील बाजार समिती व करंजाड उपबाजार आवारात सुमारे एक हजार वाहनांमधून सुमारे १५ हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. उन्हाळ कांद्याला एक हजार ८०० रुपये प्रती क्विंटल असा सर्वोच्च, १ हजार ६०० रुपये असा सरासरी भाव मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती शांताराम निकम, उपसभापती लक्ष्मण पवार, सचिव संतोष गायकवाड यांनी दिली. (15 thousand quintals of summer onion arrived in Nampur market)

मोसम खोऱ्यात यंदा विक्रमी कांदा शेतकऱ्यांकडे आहे. परंतु, रोगट हवामानामुळे कांद्याचे आयुष्य कमी झाल्याने चाळीत साठवून ठेवलेला कांदा खराब होवू लागला आहे. तसेच, खरीप हंगामासाठी रासायनिक खते, मजुरी आदी बाबींसाठी शेतकऱ्यांना आर्थिक गरज असल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. गुरुवारी (ता. २२) सकाळी नऊपासून लिलावाला सुरुवात झाली. कोरोनाचे सर्व नियम पाळून नामपूरला आठशे, तर करंजाडला दोनशे वाहनांचे लिलाव करण्यात आले. जिल्हा उपनिबंधक, सटाणा येथील सहाय्यक निबंधक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कोरोना काळात बाजार समितीचे लिलाव कामकाज नियमित सुरु झाले आहे. शेतकऱ्यांनी मालाची प्रतवारी करून माल विक्रीस आणावा, लिलाव झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांकडून रोख पेमेंट घ्यावे, कोरोनाकाळात गर्दी टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सचिव संतोष गायकवाड, अरुण अहिरे यांनी केले आहे.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यातील धरणसाठ्यात २४ तासात समाधानकारक वाढ

नामपूरचे बाजारभाव असे :

कमी जास्त सरासरी

कांदा ३०० १८०० १६००

मका १७५२ १७५२ १७५२

गहू १६०० १६०० १६००

चना ३००० ४१२६ ३५००

कुळीद २००० २००० २०००

डाळिंब ५० १२०० ७००

(15 thousand quintals of summer onion arrived in Nampur market)

हेही वाचा: नाशिक : अखेर 'तो' बहुचर्चित आंतरधर्मिय विवाह संपन्न

loading image