Nashik Winter Update : शहरात 1.6 मिलिमीटर पावसाची नोंद; वाऱ्यामुळे गारव्‍याची नागरिकांना अनुभूती

हिवाळ्यात पुन्‍हा एकदा अवकाळी पावसाच्‍या हजेरीने वातावरणातील बदलांबाबत चिंता निर्माण झालेली आहे.
1.6 mm of rain has been recorded by  Meteorological Department in city nashik news
1.6 mm of rain has been recorded by Meteorological Department in city nashik news

Nashik Winter Update : ऐन हिवाळ्यात पुन्‍हा एकदा अवकाळी पावसाच्‍या हजेरीने वातावरणातील बदलांबाबत चिंता निर्माण झालेली आहे. बुधवारी (ता. १०) सकाळच्‍या वेळी शहरातील अनेक ठिकाणी पाऊस झाला.

या वेळी १.६ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्‍याने घेतली आहे. सध्या पारा वाढलेला असला तरी वाऱ्यामुळे नागरिकांना गारवा जाणवतो आहे. (1.6 mm of rain has been recorded by Meteorological Department in city nashik news)

यंदाच्‍या हिवाळ्यात पाऱ्यात सातत्‍याने चढ-उतार सुरू राहिला आहे. बुधवारी सकाळी पाऊस झाल्‍यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण होते. यामुळे सूर्य झाकोळला गेल्‍याने दुसरीकडे वातावरणात गार वाऱ्यामुळे थंडीची तीव्रता जाणवत होती.

एक दिवसापुरती पावसाची शक्‍यता वर्तविलेली असताना, मात्र पुढील दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण कायम राहाण्याची शक्‍यता आहे.

1.6 mm of rain has been recorded by  Meteorological Department in city nashik news
Nashik Winter Update: इगतपुरी तालुक्यात सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ! दाट धुक्याने मंदावला मुंबई आग्रा महामार्ग

बुधवारी नाशिकचे किमान तापमान १७.२ अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे.

पाऱ्यात मोठ्या स्‍वरूपात चढ-उतार सुरू असून, यामुळे साथीच्‍या रोगांचे प्रमाण वाढत असल्‍याचे निरीक्षण वैद्यकीय क्षेत्रातील तज्‍ज्ञांनी नोंदविले आहे.

1.6 mm of rain has been recorded by  Meteorological Department in city nashik news
Nashik Winter Update : सकाळी धुके, दिवसभर कमी 'व्‍हिजिब्‍लिटी'; वार्यामुळे वाढला गारठा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com