Nashik Winter Update: इगतपुरी तालुक्यात सूर्यनारायणाचे दर्शन दुर्लभ! दाट धुक्याने मंदावला मुंबई आग्रा महामार्ग

इगतपुरी तालुक्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून, सलग दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने तालुक्यात मांडव धरला आहे.
A student cycling to school through the fog
A student cycling to school through the fogesakal

इगतपुरी : तालुक्यात सध्या थंडीचा कडाका वाढला असून, सलग दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ वातावरणाने तालुक्यात मांडव धरला आहे. त्यामुळे सूर्यनारायणाचे दर्शनही दुर्लभ झाले.

गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानातही मोठी घसरण झाली असून, शीतलहरींमुळे दिवसाही नागरिकांना गारव्याचा सामना करावा लागत आहे.

अनेकांनी दिवसा स्वेटर, तर रात्री शेकोटीचा आधार घेतल्याचे चित्र पाहावयास मिळाले. सध्या बोचऱ्या थंडीचा अनुभव इगतपुरीकरांनी येत आहे. बोचऱ्या थंडीमुळे घोटी, इगतपुरीकर गारठत आहेत. (Sighting of sun rare in Igatpuri taluka Dense fog slows Mumbai Agra highway Nashik Winter Update)

A student cycling to school through the fog
Nashik Winter Update : मालेगावसह परिसरामध्ये थंडीमध्ये अचानक वाढ

इगतपुरी तालुक्यात सलग दोन दिवस तापमान कमी नोंदविले गेले. त्यामुळे सकाळी थंडीचा कडाका जाणवत असला, तरी दिवसाही शीतलहरींमुळे वातावरणात गारवा जाणवत आहे.

कसारा घाटात धुक्याची चादर

येत्या काही दिवसांत रात्री गारवा वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. नाशिक, अहमदनगर, महाबळेश्वर आदी ठिकाणी किमान तापमान सरासरीच्या खाली आले आहे, तर पुणे, कोल्हापूर, सोलापूरला किमान तापमान सरासरीच्या आसपास आहे.

यंदा इगतपुरी तालुक्यासह जिल्ह्यात पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने थंडीचा मुक्काम वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई-आग्रा महामार्गासह कसारा घाट परिसरात धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे सर्वाधिक वर्दळीचा मुंबई-आग्रा महामार्ग मंदावला आहे.

A student cycling to school through the fog
Nashik Winter Update : सकाळी धुके, दिवसभर कमी 'व्‍हिजिब्‍लिटी'; वार्यामुळे वाढला गारठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com