Nashik: सिन्नरला कांदा अनुदानाचे 18 कोटी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात; उन्हाळ कांदा उत्पादकांना देखील दिलासा

Onion
Onionesakal

Nashik News : राज्य सरकारने जाहीर केलेल्या प्रतिक्विंटल 350 रुपये कांदा अनुदान मागणीसाठी कृषि उत्पन्न बाजार समिती मार्फत अर्ज दाखल करणाऱ्या सिन्नरच्या 7303 शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्यांना 18 देय असणारी कोटी एक लाख 40 हजार 800 रुपये अनुदान बँक खात्यावर वर्ग होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

बाजार समिती प्रशासनाकडून सदर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग व्हावी यासाठी नाशिकच्या जिल्हा उपनिबंधकाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. (18 crore of onion subsidy to Sinner soon in farmers accounts Summer onion growers are also relieved through former MLA Waje nashik)

कांद्याच्या दरात झालेल्या अभूतपूर्व घसरणीनंतर राज्य सरकारने दि. 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल रू. 350 प्रमाणे 200 क्विंटलपर्यंत प्रती शेतकरी याप्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

शासन आदेशानुसार 7/12 उताऱ्यावरील कांदा पिकाची खरीप व रब्बी अशी नोंद ग्राह्य धरण्यात यावी असे नमुद करण्यात आले होते. वास्तवात खरीप, रब्बी मिळून जे शेतकरी कांदा अनुदानासाठी पात्र ठरतील त्यापेक्षा अधिक शेतकरी हे उन्हाळ कांद्याची लागवड करतात.

त्यामुळे असे शेतकरी कांदा अनुदान योजनेपासून वंचित राहणार होते. ही बाब माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या निदर्शनास आल्यावर सिन्नर बाजार समितीचे सभापती डॉ. रविंद्र पवार, उपसभापती सौ. सिंधुताई कोकाटे व संचालक मंडळाने उदय सांगळे यांचे समावेत दि. 5 जुलै 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादाजी भुसे यांची मंत्रालयात भेट घेऊन निवेदन दिले होते.

कांदा अनुदान वितरित करतांना शासनाचे परिपत्रकातील जाचक अटी शिथील कराव्यात व ज्या शेतकऱ्यांचे 7/12 उताऱ्यावर उन्हाळ कांद्याची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना देखील पात्र धरण्यात यावे अशी भूमिका बाजार समिती संचालकांनी मांडली.

त्यामुळे आदेशात सुधारणा होऊन उन्हाळ कांदा लागवड करणाऱ्यांना शेतकऱ्यांना देखील योजनेत समाऊन घेण्यात आले होते. सिन्नरला सर्वाधिक लागवड ही उन्हाळ कांद्याची होते. उत्पादित केलेला कांदा काढणीनंतर चाळीत साठवून शेतकरी पुढे वर्षभर विक्री करत असतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Onion
SPPU: अमृत महोत्‍सवानिमित्त सुचवा पुणे विद्यापीठाला बोधचिन्‍ह; प्रवेशिका पाठविण्यासाठी 17 ऑगस्‍टपर्यंत मुदत

कांदा अनुदान मागणीसाठी खरीप व रब्बी ची अट काढून टाकल्यामुळे सरसकट सर्वच शेतकरी शासनाने निर्धारित केलेल्या 350 प्रतिक्विंटल कांदा अनुदानासाठी पात्र ठरले होते.

सिन्नर बाजार समितीकडे तालुक्यातील 83032 शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज सादर केले होते. त्यापैकी 7303 शेतकऱ्यांचे अर्ज पात्र ठरले असून या शेतकऱ्यांनी बाजार समितीमार्फत विक्री केलेल्या पाच लाख 14 हजार 688 क्विंटल कांद्याला प्रति क्विंटल 350 रुपये प्रमाणे 18 कोटी 1 लाख 40800 रुपये अनुदान मिळणार आहे.

हे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग व्हावे यासाठी सिन्नर बाजार समितीमार्फत जिल्हा उपनिबंधकांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. लवकरच जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशाने शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचा लाभ मिळेल असे बाजार समितीच्या वतीने सांगण्यात आले.

"सिन्नर तालुक्यातील उन्हाळा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील शासन अनुदानाचा लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता शेतकऱ्यांची अनुदानासाठी ची प्रतीक्षा लवकरच संपेल पालकमंत्री दादाजी भुसे यांनी या कामी महत्वाची भूमिका बजावली."

- डॉ. रविंद्र पवार (सभापती- सिन्नर बाजार समिती)

"बाजार समितीने केलेल्या पाठपुराव्याला यश आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या दृष्टीने संचालक मंडळ कार्यरत आहे. महसुल निकष शिथील केल्याबद्दल शासनाचे धन्यवाद. सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने व शेतकऱ्यांची पिक लागवडीची लगबग सुरु असल्याने कांदा अनुदान वितरणाची रक्कम त्वरीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा कराव्यात." - राजाभाऊ वाजे (माजी आमदार, सिन्नर)

Onion
Baipan Bhari Deva Movie: ‘बाईपण भारी देवा’ ने उडविली धूम! ग्रुपने एकाच वेशभूषेत जात महिला घेताहेत आनंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com