esakal | जिल्‍ह्यात 73 दिवसांनंतर 1 हजाराच्‍या आत पॉझिटिव्‍ह; 2 हजार 394 कोरोनामुक्‍त
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येत कमालीची घट झाली आहे. शुक्रवारी (ता.21) जिल्‍ह्‍यात 955 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तब्‍बल 73 दिवसांनंतर ही संख्या एक हजाराच्‍या आत राहिली.

नाशिक जिल्‍ह्यात 73 दिवसांनंतर 1 हजाराच्‍या आत पॉझिटिव्‍ह

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : जिल्‍ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येत कमालीची घट झाली आहे. शुक्रवारी (ता.21) जिल्‍ह्‍यात 955 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तब्‍बल 73 दिवसांनंतर ही संख्या एक हजाराच्‍या आत राहिली. दुसरीकडे दोन हजार 394 रुग्‍ण कोरोनामुक्‍त झाले. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत एक हजार 485 ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्‍ह्‍यात 16 हजार 221 बाधितांवर उपचार सुरु आहेत.

यापूर्वी गेल्‍या 9 मार्चला जिल्‍ह्‍यात 537 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले होते. त्‍यानंतर रोज एक हजाराहून अधिकच पॉझिटिव्‍ह आढळत होते. दरम्‍यान शुक्रवारी नाशिक महापालिका क्षेत्रातील 468, नाशिक ग्रामीणमधील 465, मालेगाव महापालिका क्षेत्रातील 22 रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. कोरोनामुक्‍त झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 536, नाशिक ग्रामीणमधील 810 तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील 48 रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे.

सायंकाळी उशीरापर्यंत जिल्‍ह्‍यात चार हजार 413 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. यात नाशिक ग्रामीणमधील दोन हजार 803, नाशिक शहरातील एक हजार 387 तर मालेगावच्‍या 223 रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार 690 रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील एक हजार 534 रुग्‍णांचा समावेश होता. जिल्‍हा रुग्‍णालयात तीन, डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात 12 रुग्‍ण दाखल झाले. नाशिक ग्रामीणमधील 111 तर मालेगाव महापालिका क्षेत्रातील 29 रुग्‍णांचा समावेश आहे.

हेही वाचा: VIDEO : नाशिकमध्ये 'म्युकोरमायकोसिस'चे इंजेक्शन मिळेना

कोरोना मृत्‍यू सत्र सुरुच, 46 बाधितांचा बळी

नव्‍याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांच्‍या संख्येत घट होत असली तरी कोरोना बळींचे प्रमाण अद्यापही चिंताजनक स्‍थितीत आहे. शुक्रवारी 46 बाधितांचा कोरोनाने बळी घेतला. यात नाशिक शहरातील सर्वाधिक 25 मृत आहेत. पंचवटी, नाशिकरोड भागासह जुने नाशिक भागातील मृतांचा यात समावेश आहे. नाशिक ग्रामीणमध्ये 21 बाधितांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला. ग्रामीणमध्ये नाशिक शहरालगत असलेल्‍या देवळाली कॅम्‍प आणि वासळी असे दोन मृत नाशिक तालुक्‍यातील आहेत. सिन्नर तालुक्‍यातील चार, निफाड तालुक्‍यातील तिघांचा समावेश आहे. बागलाण, येवला, कळवण, दिंडोरी तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोघांचा तर पेठ, नांदगाव, मालेगाव व देवळा तालुक्‍यातील प्रत्‍येकी एका बाधिताचा कोरोनाने बळी घेतला आहे.

हेही वाचा: युवासेनेत जिल्हाप्रमुख बदलावरून घमासान; शिवसैनिकांत ‘अर्थ’पूर्ण चर्चेला उधाण 

loading image