नाशिक शहरात १९२० बोगस फेरीवाले; पडताळणीतून प्रकार उघडकीस

street vendors
street vendorsesakal

नाशिक : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात नऊ हजार ६२० पैकी तब्बल एक हजार ९२० बोगस फेरीवाले निघाले असून, त्यांची नावे वगळण्यात आली आहे. अद्यापही अडीच हजारांच्या वर बोगस नावे असल्याचा संशय महापालिकेला असून, त्यांची पडताळणी करून त्यांची नावे वगळून उर्वरित फेरीवाल्यांना जागांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (1920-bogus-hawkers-in-nashik-marathi-news)

फेरीवाल्यांसाठी मुक्त व प्रतिबंधित असे क्षेत्र

केंद्र सरकारने २०१३ मध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरण जाहीर केले. या धोरणांतर्गत फेरीवाल्यांना व्यवसायासाठी स्थान निश्चित करून त्यावर व्यवसाय करण्यास मुभा देवून शहरांना येणारा बकालपणा दूर करण्याचा उद्देश होता. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी बायोमेट्रिक नोंदणी करण्यात आली. पहिल्या टप्प्यात नऊ हजार ६२० फेरीवाल्यांची नोंदणी करण्यात आली. नोंदणी झालेल्या फेरीवाल्यांसाठी मुक्त व प्रतिबंधित क्षेत्र, असे दोन झोन तयार करण्यात आले. या दोन्ही झोनमध्ये २२५ क्षेत्रांची निश्चिती करण्यात आली.

नोंदणी झालेल्या फेरीवाल्यांसाठी मुक्त व प्रतिबंधित क्षेत्र, असे दोन झोन तयार करण्यात आले. या दोन्ही झोनमध्ये २२५ क्षेत्रांची निश्चिती करण्यात आली. मुक्त फेरीवाला क्षेत्रात १६६, तर प्रतिबंधित क्षेत्रात ५९ स्थळे निश्चित करण्यात आले. मुक्त फेरीवाला क्षेत्रात व्यवसाय करताना वेळेचे बंधन ठेवले नाही, तर प्रतिबंधित क्षेत्रामध्ये ठराविक वेळेमध्येच व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन २२५ व्यतिरिक्त ८३ ना फेरीवाला क्षेत्रे जाहीर करण्यात आली. फेरीवाल्यांची बायोमेट्रिक नोंदणी व स्थळ निश्चिती करताना बोगस नावे घुसविण्यात आल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार कागदपत्रे व दहा वर्षाचा व्यवसायाचे पुरावे तपासण्यात आली. त्यात एक हजार ९२० बोगस नावे असल्याचे समोर आले. त्यात दुबार नावांचा व एकाच कुटुंबातील अधिक सदस्यांचा समावेश आढळून आला.

street vendors
माझी शूटिंग काढा’ अन् क्षणातच पुलावरून तरुणाची नदीत उडी

७७०० फेरीवाले निश्चित

एक हजार ९२० नावे वगळल्यानंतर सात हजार ७०० फेरीवाल्यांची आकडेवारी निश्चित करण्यात आली आहे. त्यात विभागनिहाय आकडेवारी लक्षात घेता नाशिक रोड विभागात एक हजार ७०५, पश्चिम विभागामध्ये १७००, पंचवटी विभागात एक हजार ६५३, सिडको विभागात एक हजार ९७, पूर्व विभागामध्ये साडे आठशे, सातपूर विभागात ६८३ नावे शिल्लक राहिली आहेत. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेता २२५ फेरीवाला क्षेत्रव्यतिरिक्त ८३ नवीन राखीव क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. भविष्यात या क्षेत्रात जागांचे वाटप केले जाणार आहे. नाशिक रोड विभागात २६, पश्चिम विभागात २३, सिडकोत चौदा, पूर्व विभागात तीन, पंचवटी विभागात १३, तर सातपूर विभागातील चार क्षेत्रांचा समावेश आहे.

(1920-bogus-hawkers-in-nashik-marathi-news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com