Shiv Jayanti 2023 : शिवजयंतीसाठी 195 मंडळांना परवानगी; 108 मंडळांचे अर्ज नाकारले

Shiv Jayanti 2023
Shiv Jayanti 2023esakal

नाशिक : मंडप धोरणाच्या नियमांची पुर्तता न केल्याने शहरात तब्बल १०८ मंडळांच्या शिवजयंतीच्या परवानगी नाकारली आहे. महापालिकेकडे एकूण ३२६ मंडळांचे अर्ज प्राप्त झाले होते.

त्यातील १९५ मंडळांना परवानगी देण्यात आली, तर अद्यापही वीस अर्जांवर दोन दिवसात निर्णय घेतला जाणार आहे. (195 mandals get permission for Shiv Jayanti 2023 Applications of 108 mandals rejected nashik news)

दरम्यान, यंदा नाशिक रोडपेक्षा सिडको विभागात शिवजयंतीचा जोर असल्याचे मंडळांच्या परवानगीवरून दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरात सर्वत्र भगवेमय वातावरण झाले आहे.

जयंतीसाठी महापालिकेची परवानगी आवशक्य आहे. महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारणीसाठी शासनाच्या मंडप धोरणानुसार परवानगी बंधनकारक केली आहे. मंडळांना परवानगीसाठी एक खिडकी योजना राबविण्यात आली.

महापालिकेकडे अर्ज केल्यानंतर बांधकाम, अग्निशमन विभाग, शहर वाहतूक शाखा व संबंधित पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांकडून संयुक्त पाहणी करून ना हरकत दाखले देण्याचे धोरण अवलंबिले होते.

त्यानुसार एकूण ३२६ मंडळांचे अर्ज महापालिकेला प्राप्त झाले. त्यातील १९५ मंडळांना परवानगी देण्यात आली. मंडप धोरणाची अंमलबजावणी न झाल्याने १०८ अर्ज नाकारण्यात आले. नाकारण्यात आलेल्या अर्जांमध्ये बहुतांश अर्ज मंडळांचे दुबार नावांचे होते.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Shiv Jayanti 2023
Immunity Booster Fruits : वाढत्या उन्हामुळे फळे खरेदीकडे कल

सिडकोत जयंतीचा जोर

दरवर्षी नाशिक रोडमध्ये शिवजयंतीचा जोर असतो. यंदा, मात्र नाशिक रोडपेक्षा सिडको आघाडीवर आहे. सिडको विभागात ८६ अर्ज प्राप्त झाले होते. त्यातील ४६ मंडळांना परवानगी दिली, तर ३४ मंडळांना परवानगी नाकारण्यात आली.

पंचवटी विभागात ५८ मंडळांचे अर्ज प्राप्त झाले. त्यातील ३१ मंडळांना परवानगी देण्यात आली, तर १८ मंडळांची परवानगी नाकारण्यात आली. सातपूर विभागात ५१ मंडळांनी परवानगी मागितली. ४७ मंडळांना परवानगी देण्यात आली.

पूर्व विभागात ४६ मंडळांनी अर्ज केले, त्यातील २४ मंडळांना परवानगी देण्यात आली तर २० मंडळांना परवानगी नाकारण्यात आली. पश्चिम विभागात ४३ मंडळांनी अर्ज केले. त्यातील तीस मंडळांना परवानगी देण्यात आली, तर नऊ मंडळांना परवानगी नाकारण्यात आली.

नाशिक रोड विभागात ४२ मंडळांनी अर्ज केले. त्याला २९ मंडळांना परवानगी देण्यात आली, तर बारा मंडळांना परवानगी नाकारण्यात आली.

Shiv Jayanti 2023
Rudraksh Mahotsav : हर हर महादेवचा जयघोष करत वाहने सिहोरकडे रवाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com