Rudraksh Mahotsav : हर हर महादेवचा जयघोष करत वाहने सिहोरकडे रवाना

मालेगावातील सेवेकरी भोजन कक्षासह रुद्राक्ष वाटपाची सेवा देणार
Shiva devotees going to the service for the Rudraksh festival held at Sehore.
Shiva devotees going to the service for the Rudraksh festival held at Sehore.esakal

मालेगाव (जि. नाशिक) : पंडीत श्री प्रदीप मिश्रा यांच्या रुद्राक्ष महोत्सवासाठी मालेगावातून शेकडो वाहनातून सेवेकरी बुधवारी (ता.१५) सिहोरकडे रवाना झाले. ‘हर हर महादेव’, ‘श्री शिवाय नमस्तुभ्यं’ चा श्रद्धाळूकडून जयघोष केला जात होता.

बुधवारी (ता.१५) सकाळी कॉलेज ग्राउंडवर एकत्र येत विविध वाहनातून शिवभक्त मार्गस्थ झाले. जिल्ह्यासह खानदेशमधून शेकडो वाहनातून हजारो शिवभक्त सिहोरकडे जात आहेत. मालेगावातील सेवेकरी भोजन कक्षासह रुद्राक्ष वाटपाची सेवा देणार आहेत.

सात दिवसासाठी सेवेकऱ्यांना येथील पुण्य श्री शिवमहापुराण कथा समितीतर्फे गणवेष व पास देण्यात आले आहेत. (Rudraksh Mahotsav 2023 Vehicles leave for Sehore chanting Har Har Mahadev nashik news)

सिहोर येथे होणाऱ्या रुद्राक्ष महोत्सवासाठी मालेगावकरांची तयारी महिन्यापासून सुरु आहे. समितीचे पदाधिकारी महिन्यापासून अहोरात्र काम करीत आहेत. ७०० पेक्षा अधिक सेवेकरी सेवा देणार आहेत.

सेवेकऱ्यांची वाहने कॉलेज ग्राऊंडवरुन रवाना झाली. यावेळी दानशूरांकडून शिवभक्तांना चहा, नाश्‍ता व दुपारच्या जेवणाचे पॅकेट देण्यात आले. पाण्याच्या बाटल्यांचे वितरण देखील करण्यात आले.

नाशिक जिल्ह्यासह खानदेशमधून हजारो वाहने सिहोरकडे रवाना होत आहेत. सायंकाळनंतर श्रद्धाळू मोठ्या संख्येने मार्गस्थ झाले. श्रध्दाळूंच्या गर्दीमुळे मालेगाव ते इंदोर व इंदोर ते सिहोर या मार्गावर श्री शिवाय नमस्तुभ्यं व हर हर महादेवचा जयघोष अहोरात्र सुरु आहे. वाहनांच्या गर्दीमुळे इंदोरपासून पुढे काही प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

Shiva devotees going to the service for the Rudraksh festival held at Sehore.
Nashik News : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे काम निकृष्ट; ग्रामस्थांनी सुरु असलेले काम पाडले बंद

शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातूनही श्रद्धाळू सिहोरकडे आगेकुच करीत आहेत. खासगी वाहनांबरोबरच अनेक भाविक ट्रॅव्हल्स व रेल्वेने प्रवास करीत आहेत. १६ फेब्रुवारीपासून रुद्राक्ष महोत्सव सुरु होत आहे.

त्या पाश्‍र्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत सिहोरकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढतच होती. २२ फेब्रुवारीपर्यंत रुद्राक्ष महोत्सव सुरु राहणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी १८ फेब्रुवारीला सिहोर येथे शिवभक्तांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

"मालेगाव येथून सातशेपेक्षा अधिक सेवेकरी सिहोरला जात आहेत. पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. मालेगावातील सेवेकरी भोजन कक्ष व रुद्राक्ष वाटपाची सेवा देणार आहेत. सेवेकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला. सिहोर येथील श्री विठ्ठलेश सेवा समितीने मालेगावच्या सेवेकऱ्यांचे अभिनंदन केले आहे."

- देविदास पाटील, प्रमुख श्री शिवाय नमस्युभ्यं ग्रुप

Shiva devotees going to the service for the Rudraksh festival held at Sehore.
Immunity Booster Fruits : वाढत्या उन्हामुळे फळे खरेदीकडे कल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com