Nashik News : धान्य वितरणातील सुविधांसाठी 2 ॲप उपलब्ध करून देणार; सचिवांची माहिती

Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal speaking at the review meeting held in the ministry on Monday.
Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal speaking at the review meeting held in the ministry on Monday. esakal

Nashik News : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे पूर्ण कामकाज ई-ऑफिसच्या माध्यमातून केले जात आहे.

जनतेला वितरण व्यवस्थेतील सर्व सोयी-सुविधा सहजतेने उपलब्ध करून देण्याच्यादृष्टीने विभागातर्फे दोन नवीन ॲप सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती विभागाचे सचिव विजय वाघमारे यांनी दिली. विभागाच्या कामकाज आढाव्याची बैठक मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली.

त्यावेळी ॲपबद्दल श्री. वाघमारे यांनी सविस्तर माहिती दिली. (2 apps will be made available for grain distribution facilities nashik news)

बैठकीत आढावा घेण्यात आलेले मुद्दे असे : राज्यातील शिवभोजन केंद्रांची सद्य:स्थिती, त्यांचे निधी वितरण. मराठवाडा व विदर्भातील १४ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण. ‘आनंदाचा शिधा’ उपक्रमामध्ये राज्यात करण्यात आलेले शिधा वितरण.

सरकारी धान्य गुदामातील अन्न-धान्याच्या हाताळणुकीसाठी हमाल कंत्राट निश्चितीची प्रक्रिया. विभागाच्या आधिपत्याखालील पदभरतीबाबतची कार्यवाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal speaking at the review meeting held in the ministry on Monday.
Saptashrungi Devi Gad : सप्तशृंगगडावर दीपपूजन; दिवे बंद केल्यानंतर उजळले देवीचे तेजोमय रूप!

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम २०२२-२३ मधील धानासाठी प्रोत्साहनपर राशी अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना देण्यात आलेला निधी.

तृतीयपंथी नागरिकांना शिधापत्रिका वितरण. लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पोषणतत्व गुणसंवर्धित तांदूळ (फोर्टीफाईड तांदूळ) वितरण आणि पीएम-वाणी योजना. यावेळी विभागाचे सहसचिव सतीश सुपे, सहसचिव तातोबा कोळेकर, उपसचिव नेत्रा मानकामे, उपसचिव राजश्री सारंग, वित्तीय सल्लागार भगवान घाडगे आदी उपस्थित होते.

Food and Civil Supplies Minister Chhagan Bhujbal speaking at the review meeting held in the ministry on Monday.
Somvati Amavasya 2023 : सौ बार काशी... एक बार मार्कडेय ऋषी.. श्री मार्कंडेय पर्वतावर 2 लाखांवर भाविकांची गर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com