Latest Crime News | अट्टल दुचाकी चोरट्यांना येवल्यात अटक; 5 गाड्या जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police officers with the arrested bike thieves at yeola

Crime Update : अट्टल दुचाकी चोरट्यांना येवल्यात अटक; 5 गाड्या जप्त

येवला (जि. नाशिक) : शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पाच दुचाकींसह एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे. नाकाबंदी दरम्यान शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

विंचूर चौफुली परिसरात नाकाबंदी सुरू असताना दोघे संशयित दुचाकी घेऊन जात असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. चौकशी केली असता त्यांनी येवला शहर व चांदवड परिसरात दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. (2 bike thieves arrested 5 bikes seized Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Crime Update : ओझरला भाईगिरी करणाऱ्यांना खाकीचा 'प्रसाद'

त्यांच्याकडून लाल रंगाची बजाज बॉक्सर, काळ्या रंगाची बजाज पल्सर, हिरो होंडा स्प्लेंडर, पांढरी टीव्हीएस स्टार व बजाज प्लेटिना या दुचाकी मिळून आल्या आहेत. धामणगाव येथील एका गुन्ह्यातील आरोपीकडून घेतलेला पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिवाजी सुनील खुरसणे (२२) व बाळू अशोक खुरसणे (२०, दोघे रा. कानडी, ता. येवला) असे चोरट्याची नावे आहेत. पोलिस निरीक्षक भगवान मथुरे, सहायक पोलिस निरीक्षक सूरज मेढे, शहनवाज शेख, मधुकर गेठे, संदीप पगार, हेमंत लकडे, सतीश बागूल, सचिन खैरनार, लकडे आदींच्या पथकाने कारवाई केली.

हेही वाचा: Nashik : शहर-जिल्ह्यात मनाई आदेश लागू