Latest Marathi News | शहर-जिल्ह्यात मनाई आदेश लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Police Commissioner jayant naiknavare Latest News

Nashik : शहर-जिल्ह्यात मनाई आदेश लागू

नाशिक : नवरात्रोत्सव, आगामी धार्मिक सण-उत्सव यासह विविध संघटनांकडून होणारी निदर्शने, आंदोलने यामुळे शहर-जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे व नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मनाई आदेश लागू केले आहेत.

सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. तसेच, अग्निपथ सैन्य भरतीविरोधात आंदोलने व निदर्शने सुरू आहेत. पीएफआयवर एनआयएने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचप्रमाणे, मनसेतर्फे भोंग्याविरोधात आंदोलनाबाबत निवेदन दिले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात शांतता कायम राहावी, शहर पोलिस आयुक्त नाईकनवरे, ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पाटील यांनी २६ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर यादरम्यान शहर-जिल्ह्यात मनाई आदेश लागू केले आहेत. (Prohibitory orders apply in city district by Nashik Police Commissioner Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: भगर उठली जीवावर; खाल्ल्याने अनेकांना विषबाधा

त्यानुसार नागरिकांना कोणतेही दाहक किंवा स्फोटक पदार्थ सोबत नेता येणार नाही. दगड, शस्त्र, लाठ्या,बंदुका बाळगता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीचे प्रतिकात्मक प्रेताचे किंवा प्रतिमेचे प्रदर्शन किंवा दहन करता येणार नाही. आरडाओरड, वाद्य वाजवण्यास बंदी असेल. प्रक्षोभ भाषण, मिरवणुकीस बंदी घालण्यात आली आहे.

सार्वजनिक ठिकाणी महाआरती करणे, वाहनांवर झेंडे लावून फिरणे, पेढे वाटणे, फटाके फोडणे, घंटानाद करणे, शेरेबाजी करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पूर्वपरवानगी शिवाय पाच किंवा पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमण्यास, सभा घेण्यास किंवा मिरवणूक काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशांचे उल्लंघन करणारे महाराष्ट्र पोलिस कायदा १९५१ चे कलम १३५ नुसार शिक्षेस पात्र राहतील, असा इशारा दिला आहे.

हेही वाचा: Crime Update : ओझरला भाईगिरी करणाऱ्यांना खाकीचा 'प्रसाद'