Nashik News : चाळीसगाव जवळ अपघातात नांदगावचे दोघे दुचाकीस्वार ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death

Nashik News : चाळीसगाव जवळ अपघातात नांदगावचे दोघे दुचाकीस्वार ठार

नांदगाव (जि. नाशिक) : चाळीसगाव तालुक्यातील खडकी जवळील नव्या राष्ट्रीय महार्गावर आज दुपारी दोन दुचाकींच्या (Bike) झालेल्या भीषण अपघातात नांदगाव येथील दोघे ठार झाले. (2 bikers from Nandgaon were killed in an accident near Chalisgaon nashik news)

त्यात ढेकू येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक व परधाडी येथील सेवानिवृत्त लष्करी जवानाचा समावेश आहे. या घटनेमुळे नांदगाव व परधाडी येथे  हळहळ व्यक्त होत आहे. आज दुपारी चार वाजेच्या सुमाराला नांदगावहून चाळीसगावकडे दुचाकीने जाणाऱ्या व समोरून येणाऱ्या दुचाकीशी जबरदस्त धडक झाली.

त्यात दोघाही दुचाकीचे अतोनात नुकसान झाले व दुचाकीस्वारांचा जागेवरच मृत्यू झाला. चाळीसगाव पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यात ढेकू खुर्द येथील प्राथमिक शाळेत शिक्षक असलेले योगेश आनंदा जाधव (४६) हे आपले मित्र विजय सोळसे यांच्यासह  नांदगाव येथील आपल्या घरून दुपारी चाळीसगावला नव्या दुचाकीने निघाले होते.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

चाळीसगावपासून जवळ असलेल्या खडकी गावाजवळ याच सुमाराला समोरून परधाडी (ता. नांदगाव) येथील नाना रामचंद्र वाघ ( ६०) हे न्यायडोंगरी कडे  दुचाकीने येत होते.  या दोघाही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. 

त्यात योगेश आनंदा जाधव (४६)व  नाना रामचंद्र वाघ ( ६०) यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर सोळसे हे जखमी असून त्यांना चाळीसगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.