Weather Forecast : जिल्ह्यामध्ये हवामान सकाळी थंड अन् दुपारी उष्ण राहण्याचा अंदाज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weather Forecast

Weather Forecast : जिल्ह्यामध्ये हवामान सकाळी थंड अन् दुपारी उष्ण राहण्याचा अंदाज

नाशिक : उन्हाळ्याची चाहूल लागली असली, तरीही बुधवारपासून (ता. १५) पाच दिवस सकाळी थंड आणि दुपारी उष्ण हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

या कालावधीत कमाल तापमान ३२ ते ३६, तर किमान तापमान १० ते १३ अंश सेल्सिअस आणि वाऱ्याचा वेग ताशी ८.९ ते १०.४ किलोमीटर राहण्याचा अंदाज विभागाचा आहे. (Weather Forecast weather in district expected to be cold in morning and hot in afternoon nashik news)

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

इगतपुरीच्या विभागीय संशोधन केंद्रातर्फे उन्हाळी बाजरी सुधारित आणि संकरित वाणाची पेरणी बुधवारपर्यंत (ता. १५) करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच जनावरांच्या चाऱ्यासाठी ज्वारी, मका, बाजरीची याच महिन्यात पेरणी करावी.

रब्बीमधील कांद्याचे पीक दोन महिन्याचे झाले असल्यास नत्र खताचा दुसरा डोस द्यावा आणि पीक स्वच्छ ठेवावे. त्याचप्रमाणे आंब्यावरील मोहराच्या संरक्षणाची व तुडतुडे किडीच्या नियंत्रणाची खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यावी, असेही केंद्राच्या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले.

टॅग्स :NashiksummerColdWinter