MSRTC Bus Discount : पिंपळगाव आगारातून 2 कोटींचा मोफत प्रवास; 22 दिवसात इतक्या महिलांनी घेतला सवलतीचा फायदा!

MSRTC ST Bus
MSRTC ST Busesakal

MSRTC Discount : विविध घटकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात आधीच सवलती आहेत. ज्येष्ठांना अर्धे प्रवास भाडे आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षांवरील ज्येष्ठ मंडळींना मोफत प्रवास सवलत देणाऱ्या राज्य शासनाने गेल्या आठवड्यात महिलांना बस प्रवासात निम्म्या भाड्याची सवलत दिली.

दरम्यान, पिंपळगाव आगारातील बसमधून गत चार दिवसात तब्बल ४० हजार ८९३ महिलांनी प्रवास केला आहे. महिलांना अर्धे तिकीट असल्याने या मोफत प्रवासाची रक्कम दोन कोटी रूपयांच्या पुढे आहे. ही रक्कम शासन महामंडळाला अदा करणार आहे. (2 crore free travel from Pimpalgaon depot women took advantage of MSRTC Discount in 22 days nashik news)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमध्ये दिव्यांग, ज्येष्ठ, अधिस्वीकृती पत्रकार, क्षयरोगी, कुष्ठरोगी अशा विविध घटकांना मोफत व प्रवास भाड्यात सवलत योजना आहेत. या सवलतीची रक्कम शासन परिवहन महामंडळाला अदा करते.

दरम्यान, अगोदर ज्येष्ठांना बसप्रवास भाड्यात अर्धी प्रवास भाड्याची सवलत होती. गेल्या आठवड्यापासून सर्वच महिलांना बस प्रवासात प्रवास भाड्यात निम्मी सूट दिली आहे. बावीस दिवसांपूर्वी योजनेला प्रत्यक्ष सुरवात झाली आहे.

योजनेच्या दुसऱ्या दिवशी जिल्हाभरात महामंडळाच्या पिंपळगाव आगारांच्या बसमधून मोठ्या संख्येने महिलांनी प्रवास केला आहे. महिलांच्या प्रवासाच्या निम्मे भाडे योजनेतून महामंडळाला सुमारे दोन कोटी रुपये शासनाकडून देय आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

MSRTC ST Bus
Unseasonal Rain Damage : 30 एकरातील बागा आडव्या; शंभर एकरापेक्षा जास्त क्षेत्राला फटका

पिंपळगाव आगाराच्या बस मधून सर्वाधिक महिलांचा बसप्रवास झाला आहे. त्यामुळे वाट पाहीन पण बसनेच जाईन अशी मानसिकता महिलाची झाली आहे.

"महिलांना तिकीटदरात निम्मी सवलत देऊन स्त्रीयांना प्रवासाला प्रोत्साहन दिले आहे.बसचा प्रवास सुरक्षीतते बरोबर सवलतीचा होणार असल्याने शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करते."

- शीतल मोरे, सदस्या, ग्रामपंचायत, पिंपळगाव बसवंत

"महिला सन्मान योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. महामंडळाच्या बसमधून विविध घटकांना प्रवास भाडे सवलत दिली जाते. बसमधून सुरक्षित व उत्तम प्रवास सेवा दिली जाते."

- मनोज गोसावी, आगार व्यवस्थापक, पिंपळगाव बसवंत.

MSRTC ST Bus
Unseasonal Rain Damage : इगतपुरीच्या पूर्व भागात शेकडो हेक्टर बाधित; गारपिटीने शेतकरी उध्वस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com