Latest Crime News | शहरात विनयभंगाच्या घटनांत वाढ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Molestation Crime News

Nashik Crime News : शहरात विनयभंगाच्या घटनांत वाढ!

नाशिक : शहरात दोन अत्याचार व विनयभंगाच्या घटना समोर आल्या आहेत. पहिल्या घटनेत शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार एका तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून जुलै २०१७ ते आजपर्यंत वेगवेगळ्या भागात अतिप्रसंग केला. या काळात मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार पोलिसात पोचला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाण्यात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पंकज सोनवणे करीत आहेत. (2 incidents of torture and molestation in city Nashik Latest Crime News)

हेही वाचा: Nashik : बाजार समितीत हवाय उच्च दर्जाचा ‘तिसरा डोळा’!

दुसरी घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ठाणे पोलिसात तक्रार दाखल झाल्याने हा गुन्हा अंबड पोलिसांकडे वर्ग झाला आहे. फिर्यादी महिला व संशयित ठाणे शहरात वास्तव्य करतात. कामानिमित्त शहरात राहणाऱ्या संशयिताने महिलेस रजिस्टर लग्न करणार असल्याचे आमिष दाखवून नाशिकमध्ये सोबत राहण्यास भाग पाडले. या काळात महिला दोन वेळा गर्भवती राहिली. त्यानंतर संशयिताने महिला व तिच्या मुलीचा सांभाळ न करात पोबारा केल्याने हा प्रकार पोलिसात पोचला.

तिसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलगी बुधवारी (ता. २) शिकवणीसाठी घराबाहेर पडली असता, सतरावर्षीय मुलाने तिची वाट अडवून विनयभंग करीत मानेस चावा घेतला. या घटनेत मुलगी जखमी झाली असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात विनयभंग आणि बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी विधी संघर्षित बालकास ताब्यात घेतले असून, अधिक तपास उपनिरीक्षक घडवजे करीत आहेत. चौथ्या घटनेत फिर्यादी महिला गुरुवारी (ता. ३) बाथरूमला जात असताना पिंटू गौतम या परिचीताने वाट अडविली.

संशयिताने तू माझ्या सोबत चल असा आग्रह धरला, मात्र महिलेने नकार देताच त्याने विनयभंग केला. महिलेने झटापटीत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, संशयिताने गालास चावा घेऊन कानाचा लचका तोडला. या घटनेत महिला जखमी झाली असून, उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.

हेही वाचा: Nashik Crime News : शहर परिसरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ