मोटरसायकल अपघातात 2 ठार | Nashik | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

2 killed in motorcycle accident Nashik News

मोटरसायकल अपघातात 2 ठार | Nashik

वणी (जि. नाशिक) : राजापूर, ता. दिंडोरी येथे लग्नाच्या वरातीचा कार्यक्रम आटोपून मोटरसायकलवरुन (Motocycle) घरी परतांना रस्त्याच्या कडेला इलेक्ट्रीक पोलला दिलेल्या लोखंडी तारांना मोटरसायकल धडकून पिंपळगांव बसवंत येथील दोघे मोटरसायकल स्वार ठार झाल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा: शिक्षकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी : अंबादास वाजे

राजापूर तालुका दिंडोरी येथे लग्नाच्या वरातीच्या कार्यक्रमावरून १६ एप्रिल रोजी सव्वा बारा वाजेच्या सुमारास खंडेराव रमेश लोखंडे व अविनाश देविदास पोटिंदे, दोन्ही राहणार अंबिकानगर, पिंपळगाव ब. ता . निफाड घरी पिंपळगाव येथे जात असतांना राजापुर ते मातेरेवाडी जाणाऱ्या रोडच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रिक पोलला दिलेल्या ताणाला ( वायरला ) मोटार सायकल धडकली त्यात मोटार सायकल वरील दोन्ही इसम खंडेराव रमेश लोखंडे वय 22 वर्षे, अविनाश देविदास पोटिंदे वय 21 वर्षे हे ठार झाले. याबाबत वणी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: 'अमर रहे…'च्या घोषात जवान किशोर शिंदे यांना अखेरचा निरोप

Web Title: 2 Killed In Motorcycle Accident Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top