शिक्षकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी : अंबादास वाजे

Financial extortion of teachers should be stopped Ambadas Waje Nashik News
Financial extortion of teachers should be stopped Ambadas Waje Nashik Newsesakal
Updated on

चांदोरी (जि. नाशिक) : नाशिक जिल्हा परिषदेच्या (ZP) माध्यमातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांचे दर महिन्याला उशिरा होणाऱ्या वेतनामुळे गैरसोय होत आहे. या वेळी सलग मागील दोन महिन्यांचे वेतन अदा केलेले नाही. प्रशासनाने वेळेत वेतन करावे, अशी मागणी प्राथमिक शिक्षक संघांचे राज्याध्यक्ष अंबादास वाजे यांनी केली.

निफाड येथे शिक्षक महामंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे, सरचिटणीस धनराज वाणी, राज्य नेते मिलिंद गांगुर्डे, प्रदीप शिंदे उपस्थित होते. जिल्हा संघातर्फे महामंडळ सभा झाली.

Financial extortion of teachers should be stopped Ambadas Waje Nashik News
'अमर रहे…'च्या घोषात जवान किशोर शिंदे यांना अखेरचा निरोप

श्री. वाजे म्हणाले, की शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. फेब्रुवारी महिन्यांचे पगार अद्याप झालेले नाहीत. अनेक मेडिकल बिले मंजूर असूनदेखील निधीअभावी मिळत नाही. फंड प्रकरणाची बिले मिळत नाही. डीसीपीएसधारक कर्मचाऱ्यांच्या हिशेबाचा ताळमेळ बसत नाही. शासनदरबारी दखल घेतली जात असली तरी जिल्हा पातळीवर या संदर्भात योग्य ती कारवाई केली जात नाही.

Financial extortion of teachers should be stopped Ambadas Waje Nashik News
तुळजा भवानी मातेची चैत्री यात्रा

अनेक वर्षांपासून शिक्षकांचे दर महिन्याला होणारे पगार सातत्याने उशिरा होत आहेत. अनेक शिक्षकांची मुले उच्चशिक्षण घेत आहे. त्यांच्या शालेय फी, शिक्षकांच्या घरांचे हप्ते यांसह महिन्याचा खर्च, कुटुंबाची गुजराणसाठी लागणारी रक्कम आदींबाबत अडचणी निर्माण होत आहेत. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी श्री. वाजे यांनी केली.

निफाड तालुक्यातील मुख्याध्यापक संघ, महिला आघाडी, केंद्र प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली. अंबादास वाजे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे यांनी जिल्ह्यात संघांच्या कामाचा लेखाजोखा मांडला. पृथ्वीबाबा शिरसाठ, राजेंद्र पाटील, युवराज पवार, देवामामा पवार, सचिन वडजे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस आणि पदाधिकारी उपस्थित होते. माणिक कुशारे यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी निफाडचे अध्यक्ष संतोष मेमाणे, सरचिटणीस प्रकाश शिरसाठ यांसह कार्यकारिणीने प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com