esakal | नाशिक जिल्‍ह्यासाठी मिळाले सव्वा दोन लाख लशींचे डोस
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccine

नाशिक जिल्‍ह्यासाठी मिळाले सव्वा दोन लाख लशींचे डोस

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : जिल्‍ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढत असून, दैनंदिन आकडेवारी विक्रम नोंदवित आहे. मंगळवारी (ता. ७) जिल्‍ह्यासाठी दोन लाख २५ हजार लशींचे डोस प्राप्त झाले. यात दोन लाख १६ हजार कोव्‍हिशिल्‍ड लशी असून, नऊ हजार ९२० कोव्‍हॅक्‍सिन लशींचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणावर लशींचा साठा उपलब्‍ध होण्याची ही पहिलीच वेळ असून, यामुळे लसीकरण मोहिमेला आणखी गती मिळणार आहे.


राज्‍यासह नाशिक जिल्‍ह्यालाही कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला होता. सध्या प्रादुर्भावाची परिस्‍थिती नियंत्रणात असली, तरी जिल्‍हा प्रशासनातर्फे लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे. मोहिमेंतर्गत सुरवातीला तुटवड्यामुळे लसीकरण मोहीम प्रभावित होत होती. आता लशींचा साठा सुरळीत होत असल्‍याने मोहिमेला गती प्राप्त होत आहे. मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील २७ लाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दिव्यांग्य व दुर्धर आजाराने ग्रासलेल्‍या रुग्‍णांना घरी जाऊन लस दिली जात आहे. आतापर्यंत जिल्‍हाभरात एक हजार ६४३ दिव्यांग्यांना लस दिली आहे, तर अंथरुणावर असलेल्‍या ११५ रुग्‍णांचेही लसीकरण झले आहे. मंगळवारी लशींचा मोठा साठा उपलब्‍ध झाल्‍याने मोहिमेची व्‍याप्ती आणखी वाढणार आहे.

हेही वाचा: मालेगावात मित्रपक्षांत ठिणगी; शिवसेनेची कॉंग्रेस कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

loading image
go to top