esakal | मालेगावात मित्रपक्षांत ठिणगी; शिवसेनेची कॉंग्रेस कार्यालयाबाहेर घोषणाबाजी
sakal

बोलून बातमी शोधा

shivsena congress

मालेगावात मित्रपक्षांत ठिणगी; शिवसेनेची कॉंग्रेस कार्यालयाबाहेर घोषणाबाजी

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : 'ब' सत्ता प्रकरणी कृषीमंत्री दादा भुसे मालमत्ताधारकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन बच्छाव यांनी केल्याने शहरात शिवसेना-कॉंग्रेस या मित्र पक्षांमध्ये आज वादाची ठिणगी पडली. बच्छाव यांच्या आरोपांना उत्तर देत आजवरच्या गेल्या पंधरा वर्षातील पाठपुराव्याच्या कागदपत्रांसह राजकीय द्वेषातून किंमत नसलेल्या कार्यकर्त्याच्या खांद्यावर बंदून ठेवून कृषीमंत्र्यांवर आरोप केले.‘ब' सत्ता प्रकरणी आरोप करणाऱ्यांनी कागदपत्र पडताळून पहावित असे आव्हान संपर्कप्रमुख प्रमोद शुक्ला, महानगरप्रमुख रामा मिस्तरी यांनी मंगळवारी (ता.७) येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिले.

कॉंग्रेस कार्यालयाबाहेर घोषणा

पत्रकार परिषद पार पडताच शिवसेनेच्या मोजक्या पदाधिकाऱ्यांनी मोसमपूल भागातील कॉंग्रेस कार्यालय बंद असताना जोरदार घोषणाबाजी केली. काही उत्साही कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोरील झेंडा मोडून फेकत दगडफेक देखील केली. पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस पक्ष कार्यालयावर ‘ब' सत्ता प्रकरणा संदर्भातील महसूल व वनविभागाचा १८ जून २०२१ चा वर्ग १ मध्ये रुपांतर करण्याबाबतचा आदेश चिटकविला. मित्र पक्षांमधील हा वाद चर्चेचा विषय ठरला होता. आंदोलनात शुक्ला, मिस्तरी, राजू अलीझाड, राजेंद्र टिळेकर, अनिल पवार, कालीचरण बेद, विजय सेंगर, किरण पाटील, दत्ता चौधरी आदींसह प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

हेही वाचा: नाशिक : सापळा रचत पकडले 3500 किलो गोमांस


२००६ पासूनचे पुरावे दिले

मिस्तरी म्हणाले, शहर व परिसरातील ‘ब' सत्ता प्रकार मिळकतधारकांना २००५ मध्ये महसूल विभागाने नोटीस दिल्यापासून कृषीमंत्री भुसे यांनी या प्रकरणी पाठपुरावा केला आहे. यानंतर या प्रकरणासंदर्भात ८ फेब्रुवारी २००६ तहसिल कार्यालयातील बैठक, जिल्हाधिकारी, महसूल मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन, अधिवेशनातील प्रश्‍न, महसूल राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठक, १० ऑगस्ट २०१८ मधील जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक, जानेवारी २०१९ मधील मंत्रालयातील बैठक, ८ व १५ मार्चचे शासन परिपत्रक, १८ जूनचा आदेश असा संयुक्त तपशील सांगितला. वेळोवेळी केलेला पाठपुरावा, लढा, आंदोलने तालुक्यातील जनतेला ज्ञात आहेत. राज्य पातळीवर आघाडीचे तिन्ही पक्ष व मंत्री एकमेकांना विश्‍वासात घेऊन कामकाज करीत असताना कृषिमंत्र्यांवर आरोप करुन कॉंग्रेसने कुरापत काढली. या आरोपांना स्थानिक पदाधिकारी शिवसेना स्टाईलने उत्तर देतील. प्रसंगी आरोप करणाऱ्यांच्या घरासमोरही आंदोलन करु.

हेही वाचा: नाशिक : खासगी कंपनीविरोधात रुग्णवाहिका चालकांचा बेमुदत बंदभोगवटादार वर्ग-२ धारणाधिकारावर किंवा भाडेपट्याने प्रदान केलेल्या किंवा प्रदानानंतर असा वापर अनुज्ञेय करण्यात आलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-२ मध्ये रुपांतरण करण्याकरीता देय रुपांतरण अधिमूल्य रक्कम निश्चीत केलेली आहे. शासनाच्या महसूल व वन विभागाकडील परिपत्रकान्वये ‘ब'-सत्ता प्रकार अथवा अन्य कोणताही सत्ताप्रकार म्हणून नोंदविलेल्या आणि निवासी, कृषिक, वाणिज्य तसेच औद्योगिक प्रयोजनासाठी प्रदान केलेल्या जमिनीचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत.‘ब'-सत्ता प्रकार मिळकतीचा धारणाप्रकार बदलण्याबाबत कोणतीही अडचण नाही. नागरिकांनी नगर भूमापन कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज दाखल करावे.
- धनंजय निकम, अपर जिल्हाधिकारी, मालेगाव

‘ब़' त्ता सत्ता प्रकाराबाबत कुठलाही आदेश नगर भूमापन कार्यालयाला प्राप्त नाही.‘ब़' सत्ता मालमत्ताधारकांचे काही प्रस्ताव धुडकावले. चारशे प्रस्ताव धूळ खात पडून आहेत. मालमत्ताधारकांना भूमापन कार्यालय गोलमाल उत्तरे देऊन माघारी फिरवत आहेत. सॉफ्टवेअरमध्ये सुविधा नसल्याने ‘ब' सत्ता प्रकारात फेरफार होत नाही असे सांगूनही काहींची बोळवण करण्यात आली. महसूल मंत्र्यांचा कुठलाही आदेश नाही. यामुळे कृषीमंत्री दादा भुसे ‘ब' सत्ता प्रकाराबाबत फसवणूक करीत आहेत.
- नितीन बच्छाव, उपाध्यक्ष, नाशिक जिल्हा कॉंग्रेस.

loading image
go to top