esakal | वऱ्हाडी मंडळींचे पिकअप गोदावरीत कोसळले; 2 ठार, 8 जण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

वऱ्हाडी मंडळींचे पिकअप गोदावरीत कोसळले; 2 ठार, 8 जण जखमी

sakal_logo
By
माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : विवाहसोहळा आटोपून घराकडे वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेली पिकअप व्हॅन नांदूरमध्यमेश्वर गावाजवळ असणाऱ्या गोदावरी नदीपात्रावरील पुलावरून खाली कोसळल्याने झालेल्या अपघातात 2 जण ठार तर 8 जण जखमी झाले आहेत. (2 people were killed when a pickup truck fell off a bridge into a river)


सायखेडा पोलिसांनी याबाबत अधिक माहिती दिली की, जळगाव नेऊर ता. येवला येथील उत्तम घुले यांचा मुलगा योगेश याच्या विवाहासाठी सिन्नर येथे वऱ्हाडी गेले होते विवाह सोहळा आटोपुन ते निफाड सिन्नर मार्गाने निघाले होते तेव्हा गोदावरी नदीवर दुपारी सव्वा दोनच्या सुमारास समोरून आलेल्या वाहनामुळे कंट्रोल न झाल्याने चालकडून पिकअप व्हॅन क्र. एम एच 08 एच 5798 ही नदीत कोसळून ही दुर्दैवी घटना घडली. नदीमध्ये पिकअप कोसळल्याने दिसताच या ठिकाणी मासेमारी करणाऱ्या विशाल मोरे याने नदीत उडी घेत यातील 15 लोकांना बाहेर काढले त्याला रमजू शेख व सोमनाथ कुऱ्हाडे यांनीही मदत केली.

हेही वाचा: नाशिकवर पाणी कपातीचे ढग! गंगापूर धरणात ३४ टक्केच जलसाठा


तो पर्यंत घटना स्थळी नांदूरमध्यमेश्वर येथील पोलिस पाटील गोरक्षनाथ डांगले , सचिन वाघ खाणगाव येथील पोलीस पाटील दौंड ,विजय डांगले यांच्यासह ग्रामस्थांनी मदत कार्य केले यातील जखमीना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या दुर्दैवी घटनेत सई विकास देवकर, श्रीरामपूर (वय 5), मधुकर घुले जळगाव नेऊर (55) या दोघांचा मृत्यू झाला. सायखेडा पोलिस स्टेशन मध्ये अपघाताचा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते. पुढील तपास सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ करीत आहेत.

हेही वाचा: नाशिक जिल्ह्यात आज १३४ कोरोना बाधित, चौघांचा मृत्‍यू

loading image