Hindu Jan Akrosh Morcha : एकाच दिवशी 2 जनआक्रोश मोर्चा; चर्चेनंतरच परवानगी

सकल हिंदू समाजाकडून रविवारी (ता. ११) हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
Hindu Jan Akrosh Morcha
Hindu Jan Akrosh Morchaesakal

Hindu Jan Akrosh Morcha : वक्फ कायदा रद्द करा, लव्ह जिहाद कायद्याची अंमलबजावणी करण्यासह विविध मागण्यांसाठी सकल हिंदू समाजाकडून रविवारी (ता. ११) हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

तर याच मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून अल्पसंख्याक काँग्रेसतर्फे वक्फ कायद्याच्या समर्थनार्थ मुस्लिम जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. (2 public outcry marches on same day of Hindu Jan Akrosh Morcha nashik news)

दोन्ही आयोजकांनी शहर पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. परंतु पोलिसांकडून दोघांनी अद्याप परवानगी देण्यात आलेली नसून, दोन्ही गटाशी चर्चा केल्यानंतरच पोलिस निर्णय घेणार असल्याच्या भूमिकेत आहे. सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा रविवारी दुपारी चार वाजता भालेकर मैदान येथून काढण्यात येणार आहे.

हा मोर्चा मेन रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात येणार आहे. तर मुस्लिम जनआक्रोश मोर्चा जुने नाशिक येथील कठडा भागातून काढण्यात येणार आहे. बागवानपुरा, चौक मंडई, सारडा सर्कल, फाळके रोड, दूध बाजारमार्गे बडी दर्गाह येथे समारोप होईल.

Hindu Jan Akrosh Morcha
Hindu Jan Aakrosh Morcha: मुंबईच्या शिवाजी पार्कात ‘जन आक्रोश’; भाजप नेत्यांचं शक्तीप्रदर्शन

या दोन्ही मोर्चांना परवानगी मिळाल्यास व दोन्ही मोर्चे आमनेसामने आल्यास शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणालाही परवानगी दिलेली नाही. मात्र, सावध भूमिका घेत दोन्ही गटाशी पोलिस चर्चा करणार आहेत.

''शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मोर्चाच्या आयोजकांशी चर्चा करून सामंजस्याने निर्णय दिला जाईल. एकाच दिवशी दोन्ही मोर्चांना परवानगी देण्यात येणार नाही.''- किरणकुमार चव्हाण, पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक

Hindu Jan Akrosh Morcha
 Hijndu jan akrosh morcha: मुंबईच्या  आक्रोश मोर्चात ठाकरे गटाचा एकही नेता सहभागी नाही? 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com