Nashik News: 2 सख्ख्या भावांचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू; उंदीरवाडी येथील घटना

Gaurav & Swapnil
Gaurav & Swapnilesakal

Nashik News : कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या दोन सख्ख्या भावंडांचा नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना उंदीरवाडी येथे घडली.

मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात आईही पाण्यात पडली होती. मात्र, हा प्रकार आजूबाजूच्या ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने आईला वाचविण्यात यश आले. (2 Sakhkhya brothers drowned in dam Incident at Undirwadi Nashik News)

दिवाळी जवळ आल्याने ग्रामीण भागात घरातील स्वच्छतेची कामे सुरू आहेत. त्यातच नारंदी नदीला पाणी सोडल्याने बंधाराही भरलेला आहे. या ठिकाणी उंदीरवाडी येथील भाऊसाहेब जाधव यांच्या पत्नी अनिता घरातील कामे आटोपल्यावर गौरव व स्वप्नील या दोन्ही मुलांना घेऊन कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या.

कपडे धुण्याच्या नादात अचानक लहान गौरवचा (वय १६) पाय घसरून तो नदीत पडला. त्याचा मोठा भाऊ स्वप्नीलने (वय २०) त्याला वाचवण्यासाठी पाण्यात उडी घेतली. पण दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे ते बुडू लागले.

Gaurav & Swapnil
Crime News: आधी दाबला गळा मग.. वृद्ध महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार!

पोरांना बुडताना पाहून आईनेही उडी घेतली. आईलाही पोहता येत नसल्याने आईही पाण्यात बुडू लागली. हा प्रकार आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाहिल्यावर उडी मारून त्यांनी आईला वाचविले.

मात्र मुले बंधाऱ्यातील चिखलात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही भावंडांवर सायंकाळी उंदीरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्नील बी.कॉमच्या तिसऱ्या वर्षात होता. तर गौरव अकरावी सायन्सला होता.

Gaurav & Swapnil
Crime News: अरे बापरे, चोरट्याने थेट ट्रकच चोरला !

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com