Nashik News: विजेच्या धक्क्याने येवल्यात 2 कामगारांचा मृत्यू

Death
Deathesakal

Nashik News : नांदेसर शिवारातील कृष्णा इंझिटेक कंपनीतील दोन कामगारांचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला.

याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. याबाबत नांदेसर येथील पोलिसपाटील सुनील वाघ यांनी पोलिसांना माहिती दिली. (2 workers died due to electric shock Nashik News)

Death
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या

कंपनीत मंगळवारी (ता. २६) सकाळी अकराच्या सुमारास प्रवीण नानासाहेब मोहन (वय ३०, रा. नांदूर, ता. येवला) व आप्पासाहेब नामदेव गायकवाड (३४, रा. बदापूर, ता. येवला) हे दोघे कंपनीत २० फुटांची मोठी शिडी घेऊन चालले असताना, वीजतारांना शिडीचा धक्का लागला.

शिडीत विजेचा प्रवाह उतरल्याने या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच दोघांचे नातेवाईक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

घटनास्थळी पोलिस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी भेट देत परिस्थिती हाताळली. येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक लोंढे तपास करीत आहेत.

Death
Nashik Crime: बनावट दस्तावेज करून बंगल्याची परस्पर विक्री; तिघांना अटक, शासनाची लाखोंची फसवणूक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com