Dry Fruits Rate Hike : महागाईमुळे मेथीचे लाडू कडवटले!

Dry Fruit Shop
Dry Fruit Shopesakal

जुने नाशिक : थंडीच्या दिवसात मेथी आणि डिंकाचे लाडू सेवन केल्याने आरोग्य सुदृढ राहते. थंडीची चाहूल लागताच घरोघरी लाडू तयार करण्याचा जोर असतो. लाडूसाठी लागणाऱ्या सुकामेव्याच्या दरात यंदा सुमारे १५ ते २० टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे लाडूचा गोडवा काहीसा कडवडला आहे. (20 percent increase in price of dry fruits Nashik News)

धकाधकीच्या जीवनात अनेकांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले आहे. अशात घरातील ज्येष्ठ मंडळी मात्र सर्वांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आजही पुढे आहे. थंडीची चाहूल लागताच त्यांच्याकडून कुटुंबीयांसाठी मेथी आणि डिंकाचे लाडू तयार करण्याचा उपक्रम हाती घेतला जातो. काजू, बदाम, खारीक (खजूर), खोबरे अक्रोड, वेलची, डिंक, मेथी, पिस्ता अशा विविध सुकामेव्याचा वापर करून लाडू तयार केले जाते. मेथीमुळे लाडूंची चव काहीशी कडू होते. यंदा मात्र महागाईमुळे कडूपणा वाढला आहे.

सुकामेवाचा गोडवा मात्र तो कडूपणा कमी करतो. अशाप्रकारे तयार केलेले लाडू आरोग्य सुदृढ राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच घरोघरी मोठ्या प्रमाणावर मेथी आणि डिंकाचे लाडू तयार करण्याची प्रक्रिया सुरू होत असते. सकाळी लाडूंचे सेवन केले जाते. त्यामुळे कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या व्यक्तीनी सकाळी लाडू सेवन केल्याने दिवसभर थकवा जाणवत नाही. गेल्या आठ दिवसापासून शहरात रात्रीच्या सुमारास चांगलीच थंडी जाणवत आहे. शिवाय सध्या हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा तीन ऋतू एकाच वेळी शहरवासीयांना अनुभवास मिळत आहे.

त्याचादेखील परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. नागरिकांची रोगप्रतिबंधक शक्ती वाढण्यासाठी मेथी आणि डिंकाचे लाडू उपयोगी ठरत आहे. लाडू तयार करण्यासाठी सुकामेवा आवश्यक असल्याने नागरिकांचा सुकामेवा खरेदीकडे कल वाढला आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना प्रादुर्भावामुळे सुकामेव्याच्या खरेदी-विक्रीवर परिणाम झाला होता. यंदा मात्र निर्बंधमुक्त परिस्थिती असल्याने नागरिकांचा खरेदीस चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

Dry Fruit Shop
Gaming Addiction : शाळकरी 75 टक्के मुले ‘गेमींग'च्या विळख्यात

असे आहे दर (प्रतिकिलो)

पदार्थाचे प्रकार दर

खजूर (खारीक) १८० ते २२०

बदाम ६८० ते ७००

काजू ७२० ते ७५०

अंजीर ६०० ते ६५०

डिंक २०० ते २२०

वेलची १ हजार ६०० ते २ हजार

पिस्ता १ हजार २५० ते १ हजार ८५०

खोबरं १८०

अक्रोड ६००

फोडलेले अक्रोड ८००

काळे मनुका ४००

मेथी १५०

गोडंबी ७५०

"गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुमारे १५ ते २० टक्के दरवाढ झाली आहे." - संतोष उग्रेज, विक्रेता

Dry Fruit Shop
Nashik Police Training : मुंबईच्या पोलिसांकडून नाशिक पोलिस घेणार प्रशिक्षण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com