नाशिक : चांदीच्या गणपतीसमोर 21 फूट उंच गुढी

Gudipadwa festival
Gudipadwa festivalesakal

नाशिक : रविवार कारंजावरील चांदीचा गणपती मंदिरासमोर ऊर्जा संचलित सहस्रनाम वाद्य पथकातर्फे २१ फूट उंच गुढी उभारली आहे. गुढीच्या आठ मीटर खणावर देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि राज्यातील प्रमुख मंदिरे साकारली आहेत. शिवाय रांगोळीने सजलेल्या चैत्रांगणात मांगल्याची ५१ चिन्ह रेखाटली आहेत. पथकातर्फे गेल्या चार वर्षांपासून गुढी उभारण्यात येते.

खणावरील चित्र व चैत्रांगणाची संकल्पना अमी छेडा यांची आहे. खणावर सुंदर चित्रकाम शुभश्री संस्थेच्या शुभांगी बैरागी यांनी केले आहे. कॅलिग्राफी महेंद्र जगताप यांनी केले आहे, तर पोट्रेट आकारात चैत्रांगणाचे सादरीकरण पोट्रेट कलाकार पूजा बेलोकर यांनी केले आहे. खणावर साकारलेल्या मंदिरांमध्ये नाशिकचे काळाराम, पुण्यातील कात्रजचे जैन, मुंबईचे ग्लोबल विपश्‍यना पॅगोडा, पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी, तुळजापूरचे तुळजाभवानी, कोल्हापूरचे महालक्ष्मी, त्र्यंबकेश्‍वरचे ज्योतिर्लिंग, जेजुरीचे खंडोबा आदींचा समावेश आहे. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चैत्रांगण काढले जाते. अंगण स्वच्छ करून गेरुने एक चौकोन सारवून तयार केला जातो. त्यावर रांगोळीच्या सर्वात वरील बाजूला आंब्याचे तोरण काढले जाते. त्यानंतर त्याखाली देवघर काढले जाते.

Gudipadwa festival
नाशिक : छगन भुजबळ यांनी नातीसोबत उभारली मराठी नववर्षाची गुढी

देवघरात काढलेली दोन प्रतिके शिव-पार्वती अथवा लक्ष्मी-नारायण अथवा अनुराधा व स्वाती ही दोन श्रृजनांची नक्षत्रे म्हणून मानले जातात. गणपती आणि सरस्वती साकारली जाते. भारतीय संस्कृतीत अनेक समृद्धीची प्रतिके सांगितली आहेत. त्यात हत्ती, घोडा, नागाची जोडी, गरुड, शंख-पद्म, गदा, चक्र, ओम, फणी पणती, रुद्राक्ष, कामधेनूसह वासरू, अक्षय मानले जाणारे सूर्य आणि चंद्र, यशाचे प्रतीक असलेला ध्वज, नववर्षाची सुरवात म्हणून गुढी, सौभाग्य लेणी म्हणून हळदी-कुंकवाचा करंडा, ओटी म्हणजे खण नारळ, सृजनाचे प्रतीक म्हणून पाळणा, ऐश्वर्याचे प्रतीक म्हणून अंबारी अशी प्रतिके चिन्हांच्या स्वरूपात काढली जातात. याशिवाय इतर शुभचिन्ह काढली जातात. या सगळ्यांना चैत्रांगण म्हणून संबोधले जाते, असे अमी छेडा यांनी सांगितले.

Gudipadwa festival
नाशिकमध्ये साडेतीन लाखांत घर; नेरकर प्रॉपर्टीजचा प्रकल्प

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com