नाशिक जिल्‍ह्यात कोरोनाच्या ॲक्‍टिव्‍ह रुग्णांची संख्या घटतेय

nashik district corona updates marathi news
nashik district corona updates marathi newsesakal

नाशिक : जिल्‍ह्यात अद्यापही काही प्रमाणात कोरोना बाधित आढळत असल्‍याने सावधगिरी बाळगण्याची आवश्‍यकता आहे. दरम्यान बुधवारी (ता.१६) जिल्‍ह्यात २१६ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. तर १४२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. दिवसभरात चार बाधितांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. जिल्‍ह्यात सद्यःस्‍थितीत ३ हजार ५८५ बाधितांवर उपचार सुरु आहेत. (nashik corona updates 216 new corona patients found in district)

बुधवारी नाशिक महापालिका क्षेत्रात १३३ पॉझिटिव्‍ह आढळले. नाशिक ग्रामीणमध्ये ७३, मालेगावला चार, जिल्‍हा बाहेरील सहा रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले. १४२ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली आहे. दिवसभरात झालेल्‍या चार मृत्‍यूंमध्ये नाशिक ग्रामीणमधील तीन तर नाशिक शहरातील एका मृताचा समावेश आहे. सायंकाळी उशीरापर्यंत ९६२ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यात नाशिक ग्रामीणमधील ४९९, नाशिक शहरातील २१७, मालेगावच्‍या २४६ रुग्‍णांना अहवालाची प्रतिक्षा होती. जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ८०५ रुग्‍ण दाखल झाले. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील ७४८ रुग्‍णांचा समावेश होता. डॉ.वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात एक रुग्‍ण दाखल झाला. नाशिक ग्रामीणमध्ये ४१ तर मालेगाव क्षेत्रात पंधरा रुग्‍ण दाखल झाले.

nashik district corona updates marathi news
जिल्ह्यात टॅंकरच्या पाण्यावर भागतेय एक लाख नागरिकांंची तहान

२६७ मृतांच्‍या पोर्टलवर नोंद

कोरोनामुळे झालेल्‍या मृत्‍यूची भीषणता हळुहळु समोर येते आहे. बुधवारी पोर्टलवर आणखी २६७ मृतांच्‍या नोंदी झाल्‍या आहेत. यात नाशिक महापालिका क्षेत्रातील १६६, नाशिक ग्रामीणमधील शंभर, मालेगाव महापालिका क्षेत्रातील एका मृताचा समावेश आहे.

(nashik corona updates 216 new corona patients found in district)

nashik district corona updates marathi news
महापारेषण कंपनीत नोकरभरतीचा मार्ग मोकळा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com