जिल्ह्यात टॅंकरच्या पाण्यावर भागतेय एक लाख नागरिकांंची तहान

Water Tanker
Water TankerGoogle
Updated on

नाशिक : पावसाळा सुरू होउनही जिल्हयातील ८ तालुक्यातील १ लाख नागरिकांची तहान टँकरने भागवली जात आहे. जिल्ह्यातील ५८ गावे, २६ वाडया अशा ८४ गावांना पाणीपूरवठा केला जात असून टँकरच्या १०० फेऱ्या मंजूर करण्यात आल्या आहेत. (Water is being supplied by tanker to 1 lakh citizens in 8 talukas of Nashik district)



मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता तुलनेने कमी आहे. नेहमीचा अनुभव लक्षात घेता जिल्ह्यात मार्च महिन्यापासूनच पाणीबाणी सुरु होते. टँकरद्वारे ग्रामीण भागातील वस्त्या व वाडयांमध्ये पाणी पुरवठ्याला सुरुवात होते. यंदा एप्रिल अखेर पर्यंत टँकरची मागणी कमी होती. पण हळूहळू तापमानाचा पारा चढत गेला तसतशी टँकरची मागणी वाढू लागली. मागील वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने यंदा टंचाईच्या झळा बसणार नाही अशी शक्यता वर्तविली जात होती. जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने दमदार बॅटींग केल्याने सर्वचजण सुखावले. मात्र पावसाने उघडीप दिल्याने पुन्हा एकदा उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या आहेत. |

जिल्हयातील धरणांत २६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वाधिक पाणी टंचाईची झळ ही येवला तालुक्याला बसत आहे. या ठिकाणी १७ गावे व १३ वाडयांना १० टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. त्या खालोखाल अतिवृष्टी अशी ओळख असलेल्या पेठ तालुक्यात ७ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. बागलाण, चांदवड, देवळा, मालेगांव, नांदगाव, पेठ, सुरगाणा या तालुक्यातील १ लाख ६३१ नागरिकांची तहान टँकरव्दारे भागवली जात आहे.

Water Tanker
नाशिक ऑक्सिजन दुर्घटना पावसाळी अधिवेशनात गाजणार



तालुकानिहाय टँकर

  • बागलाण ६

  • चांदवड ५

  • देवळा २

  • मालेगांव ५

  • नांदगाव १

  • पेठ ७

  • सुरगाणा ५

  • येवला १०

(Water is being supplied by tanker to 1 lakh citizens in 8 talukas of Nashik district)

Water Tanker
नाशिकच्या 'बॉश' कंपनीतील चोरी प्रकरणी ५ संशयितांना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Education expert Bhausaheb Chaskar urged immediate restructuring of the Teacher Eligibility Test to improve the quality of school education.
Tukaram Mundhe milk adulteration complaint
Who is Prashant Wadile?
MP Supriya Sule
Marathi News Esakal
www.esakal.com