
22 जणांच्या मोक्कावर एकत्रच शिक्कामोर्तब; दहा वर्षात पहिल्यांदाच कारवाई!
नाशिक : शहरातील वेगवेगळ्या भागात एकुण 22 गुन्हेगारांच्या (criminal) टोळीविरुध्द पोलीस आयुक्त दीपक पांडे (police commissioner deepak pandey) यांनी मोक्काअंतर्गत कारवाई करत प्रस्ताव अपर पोलीस महासंचालकांकडे पाठविला होता. बुधवारी (ता 12) या प्रस्तावास मंजुरी मिळाली. गेल्या दहा वर्षात पहिल्यांदा एकदम 22 जणांवर मोक्का कारवाई होत आहे
22 जणांच्या मोक्कावर महासंचालकाकडून शिक्कामोर्तब
उपनगर पोलीस ठाणे हद्दीत गेल्या वर्षी चयल यास टोळीने ठार मारल्याची घटना घडली होती. संशयितांविरुध्द पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या वेळी चयल याचा मित्र सुरज बद्रीनारायण कहाणे यास संशयित हल्लेखोरांनी चाकूचा धाक दाखवून त्याची ॲक्टिवा दुचाकी बळजबरीने हिसकावून घेत पलायन केले होते. उपनगर पोलीसांसह गुन्हेशाखा युनिट 2 व मध्यवर्ती गुन्हेशाखा यांच्या पथकांनी समांतर तपास करत गुन्ह्याचा मुख्य सुत्रधार सागर सुरेश म्हस्के उर्फ सोनु पाईकराव (22) याच्यासह एकुण 11 संशयितांना अटक केली होती. या गुन्ह्याच्या तपासात संघटितप्रकारे गुन्हेगारांची टोळी सक्रीय असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी तपासाला गती दिली. दरम्यान, उर्वरित 11 साथीदारांच्या दुसऱ्या टोळीच्याही मुसक्या बांधल्या. या सराईत गुन्हेगारांच्या टोळीविरुध्द पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी मोक्काअन्वये कारवाई करीत 22 संशयितांच्या टोळीचा मोक्काच्या कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पाठविला होता. पोलिस आयुक्तांनी दिलेल्या प्रस्तावावर पोलीस महासंचालक कार्यालयाने मान्यता मोहोर देत मोक्का कायद्यान्वये विशेष मोक्का न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा: निफाडच्या बहिणीला मालेगावच्या भावाचा आधार! संकटकाळात जपली माणुसकी
यांच्यावर चालणार ‘मोक्का’नुसार खटला
मुख्य सुत्रधार व टोळीप्रमुख सागर सुरेश म्हस्के उर्फ सोनु पाईकराव याच्यासह रोहीत सुरेश लोंढे उर्फ भु-या, जय उर्फ वाल्मीक घोरपडे, राहुल भारत तेलोरे, कलाम सलिम राईन, सत्तु भैरु राजपुत, हर्ष सुरेश म्हस्के, जॉन चलन पडेची, योगेश श्रावण बोडके, साहील सुरेश म्हस्के, अमन हिरालाल वर्मा, अक्षय राजेंद्र पारचे, बाबु मनियार उर्फ संदिप सुंदरलाल, शिबन शफी शेख, अनुज हरबिर बेहनवाल, गोलु जेसुला बाबु, आतिश वामन तायडे, बॉबी उर्फ हर्ष किशोर बाबु, अजय राजेंद्र लोहट यांच्यासह तीन विधीसंघर्षित बालकांवर आता मोक्कानुसार खटला चालणार आहे.
हेही वाचा: मालेगावात अत्यावश्यक सेवेतील वाहनांनाच लॉकडाउन काळात इंधन पुरवठा
Web Title: 22 People Sealed Together Nashik Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..