Nashik News: भाजप आमदार-खासदारांना झुकते माप! आदिवासी भागातील रस्त्यांसाठी 229 कोटी

Department of Tribal Development
Department of Tribal Developmentesakal

Nashik News : आदिवासी भागातील रस्त्यांची कनेक्टव्हीटी वाढावी ही बाब आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी निर्देशनास आणून दिल्यानंतर राज्य शासनाने भगवान बिरसा मुंडा जोड रस्ता योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

या योजनेतंर्गत अनुसूचित जमातींसाठी राखीव मतदारसंघातील गावे, वाड्या, वस्त्यासाठी रस्ते बांधकाम आणि रस्ते दुरुस्ती केली जाणार आहे. पहिल्या टप्यात तब्बल १२६२ कोटी रुपये आदिवासी विकास विभागाकडून उपलब्ध करून दिला आहे.

यात नाशिक जिल्हयाला २२९ कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे. या निधी वाटपात प्रामुख्याने भाजप आमदार-खासदारांच्या मतदारसंघात निधी देत त्यांना झुकते माप देण्यात आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदार-खासदारांना या निधीची प्रतिक्षा आहे. (229 crore apporved for roads in tribal areas Nashik News)

डॉ. गावित यांनी गतवर्षी सकाळ कार्यालयास भेट दिली होती, त्याप्रसंगी आदिवासी भागात रस्त्यांची कनेक्टव्हीटी वाढविणे आवश्यक असल्याचे सांगत, रस्ते विकासासाठी चार हजार कोटींची मागणी करणार असल्याचे त्यांनी नमूद केले होते.

शुक्रवारी (ता.१८) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी वाडे, पाड्यांना जोडणारी ५ हजार कोटी आदिवासी भागातील वाडे, पाडे, गावे यांना बारमाही रस्त्यांनी जोडणारी ‘भगवान बिरसा मुंडा जोडरस्ते योजना' मंजूर करत जाहीर केली.

यात आदिवासी विकास विभागाकडून ३२ मतदारसंघासाठी १२६२ कोटींचा निधी देण्यात आला आहे. या वाटपात प्रामुख्याने भाजप आमदार-खासदार यांच्या असलेल्या राखीव मतदारसंघात भरघोस निधी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदारांनाही मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदारांनाही निधी मिळालेला नाही.

दुसऱ्या टप्यातील निधी वाटपात राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदारांनाही असा निधी दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Department of Tribal Development
Nashik Rain Crisis: जिल्ह्यावर दुबार पेरणीचे संकट! खरिपाच्या 91.58 टक्के पेरण्या

नाशिक जिल्हयात मिळालेला निधी

१) केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार (७२.०५ कोटी)
२) खासदार डॉ. सुभाष भामरे (२९.३० कोटी),
३) आमदार दिलीप बोरसे (७४.८५ कोटी)
४) आमदार डॉ. राहुल आहेर (४२.६३ कोटी)

नाशिकला आणखी निधीची प्रतिक्षा

इगतपुरी तालुक्यातील महिलेला डोली करून दवाखान्यात नेल्याचे समोर आलेले असताना स्वातंत्रदिनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खैरायपाली ग्रामपंचायतींतर्गत येणारा माचीपाडा येथे प्रसुती झालेल्या आईला डोली करून अन् बाळाला पदरात गुंडाळून तीन ते चार किलोमीटर पायपीट करून दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघातील आमदार हिरामण खोसकर यांसह राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दिंडोरी, आमदार नितीन पवार यांच्या कळवण-सुरगाणा तसेच सिन्नर विधानसभा मतदारसंघातील आदिवासी भागातील रस्त्यांसाठी मोठया प्रमाणात निधीची प्रतीक्षा आहे.

Department of Tribal Development
Nashik Milk Rates Hike: दुधाच्या दरवाढीवर रिव्हर्स रेटने विरजण! उत्पादकांना प्रतिलिटर 8 रुपयांचा तोटा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com