
ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात; ट्रक उलटून २३ मजूर जखमी
नांदगाव (जि. नाशिक) : येथून पाच किलोमीटर अंतरावर नांदगाव- चाळीसगाव रोडवर बाभुळवाडी शिवारात मालट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात २३ ऊसतोड मजूर जखमी झाले. एकाच कुटुंबातील पती- पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाले.
पुणे भिमाशंकर येथून ऊसतोड मजुरांना घेऊन सदर मालट्रक (क्र. एमएच- १४- सीयू- २०५०) चाळीसगाव तालुक्यातील लोढरे येथे जात होता. चालक प्रदीप प्रकाश चव्हाण (रा कसाबखेडा, नांदगाव) बाभुळवाडी शिवारात ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. ट्रकमधील २५ पैकी २३ मजूर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी जखमींना नांदगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमींना मालेगावला हलविण्यात आले. जखमींमध्ये ५ पुरुषांचा समावेश आहे. उर्वरितांमध्ये महिला व ३ मुलींचा समावेश आहे.
याप्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक रामराव गाढे, पोलिस हवालदार भूषण अहिरे तपास करीत आहे.
हेही वाचा: नाशिक : कसारा घाटात दुधाच्या टँकरला आग
हेही वाचा: चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा अवघ्या 24 तासांत लावला शोध
Web Title: 23 Workers Injured In Truck Accident Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..