नाशिक : कसारा घाटात दुधाच्या टँकरला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire

नाशिक : कसारा घाटात दुधाच्या टँकरला आग

इगतपुरी शहर (जि. नाशिक) : कसारा घाटातील मुंबई राष्ट्रीय महामार्गावर सोमवार (ता. ९) पहाटे दोनच्या सुमारास मुंबईकडे जाणारा दूध टँकर (एमएच १७, बीवाय ३३३८) या चालत्या वाहनाने अचानक पेट घेतल्याने चालकाने प्रसंगावधान बघून गाडी महामार्ग रस्त्याच्या कडेला उभी करून आपले प्राण वाचवले. या आगीच्या घटनेमुळे कसारा घाटातील महामार्गावरील वाहतुकीचा दोन ते तीन तास खोळंबा झाला होता. (Milk tanker catches fire in Kasara Ghat)

मुंबई-नाशिक एक्स्प्रेसवेचे गस्त पथक अधिकारी रवी देहाडे यांना ही घटना दूरध्वनीवरून समजली असता, त्यांनी तत्काळ महामार्ग गस्त पथक टीम सोबत घटनास्थळी पोचून आग लागलेल्या वाहनावर मातीच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. पण आगीचा डोंब उसळतच असल्याने दूध टँकरचे मागील लॉक तोडून बादलीच्या सहाय्याने पथकातील सहकारी राजू उघडे, सचिन भडांगे यांच्या मदतीने दीड ते दोन तासांच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली.
संबंधित घटनास्थळी मुंबई-नाशिक एक्स्प्रेसवेच्या कर्मचाऱ्यांना कसारा पोलिस ठाण्याच्या पोलिस पथकासह पोलिस कर्मचारी तिडके, रोंगटे यांनी मदत केली. या घटनेत वाहनचालक भयभीत होऊन घटनास्थळावरून निघून गेल्याने त्याचे नाव व गाव समजू शकले नाही.

हेही वाचा: चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरचा अवघ्या 24 तासांत लावला शोध

हेही वाचा: 5G च्या काळात नेटवर्कचा बोजवारा; ग्राहकांना मन:स्ताप

Web Title: Milk Tanker Catches Fire In Kasara Ghat Nashik Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikfire
go to top