गावठाणात ‘SCADA’द्वारे 24 तास पाणीपुरवठा; पाणी वाटपाचे प्रभावी नियोजन होणार

New water supply system
New water supply systemesakal

नाशिक : शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून पार पाडला जाणार आहे. ज्या गावठाण भागात पाणी गळतीची ओरड होते, त्याच भागात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन कंपनीकडून केले जाणार आहे. चोवीस तास पाणी पुरवठ्यासाठी जगभर वापरात येत असलेल्या स्काडा प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे.

या प्रणालीमुळे पाणी गळती थांबण्याबरोबरच तंत्रज्ञानाच्या आधारे पाण्याची गुणवत्ता तपासून पाणी वाटपाचे प्रभावी नियोजन होणार असल्याचा दावा स्मार्टसिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी केला आहे. (24 hours water supply through SCADA System in villages Nashik Latest Marathi News)

New water supply system
थकीत कर वाहनांचा 14 सप्टेंबरला जाहीर लिलाव

नाशिक म्युनिसिपल स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीकडून गावठाण पुनर्विकास हाती घेण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविली जाणार आहे. योजनेत पंचवटी व बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचा पुनर्विकास केला जाणार आहे. पुनर्विकासासाठी मृदा चाचणी व नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या आरेखन करण्यात आले आहे.

मात्र, आरेखनात काही बदल करण्याचा निर्णय घेतला असून त्याअनुषंगाने बदल करून पुढील आठवड्यात आरेखन अंतिम केले जाणार आहे. अंतिम आरेखनाची पवई आयआयटी मार्फत तपासणी केली जाईल. गावठाणात पाणीपुरवठा करण्यासाठी स्काडा प्रणाली वापरली जाणार आहे.

स्काडा प्रणालीसाठी डेटा संकलन करण्यासाठी महापालिकेच्या ११० जलकुंभांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. स्काडा प्रणालीत व्यावसायिक पाण्याचे मीटर बसविण्यासाठी साठ ठिकाणी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर दोन ठिकाणी मीटर बसविले जाणार आहे.

"स्काडा वॉटर मीटर प्रणालीच्या माध्यमातून गावठाणात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे नियोजन होईल. यामुळे पाणी गळती थांबण्याबरोबरचं पाण्याची गुणवत्ता तपासणी, पाणीवाटप प्रभावी व अचूक होईल. शहर विकासाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा राहील."

- सुमंत मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट कंपनी.

New water supply system
जिल्हाधिकारी, CEO, सभापतींचे सहभोजन; पोषण माहनिमित्त अंगणवाडीत ‘डब्बा पार्टी’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com