Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या श्रावणी सोमवारसाठी 250 बसगाड्या; जाणून घ्या बसचे नियोजन

ST BUS
ST BUS Sakal

Nashik Trimbakeshwar News : श्रावण महिन्‍यात त्र्यंबकेश्‍वरला दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. त्‍यातच तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला मोठ्या संख्येने भाविक त्र्यंबकनगरीत दाखल होतात.

या भाविकांचा प्रवास सुलभ व्‍हावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्‍य मार्ग परिवहन महामंडळातर्फे अडीचशे जादा बसगाड्या या मार्गावर उपलब्‍ध करून दिल्‍या जाणार आहेत. रविवार (ता. ३)पासून जादा बसगाड्या जुने सीबीएस येथून धावतील. (250 buses for third Shravan Monday to trimbakeshwar nashik news)

श्रावण महिन्‍याच्‍या तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्‍वर येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. भाविकांच्‍या सुविधेसाठी दर वर्षी एसटी महामंडळातर्फे जादा बसगाड्यांचे नियोजन आखले जाते.

त्‍यानुसार यंदाही भाविकांच्‍या सेवेत या जादा बसगाड्या उपलब्‍ध असणार आहेत. महामंडळाने केलेल्‍या नियोजनानुसार रविवारी (ता. ३) सकाळी आठपासून या मार्गावर जादा बसगाड्या धावतील. सोमवारी (ता. ४) सायंकाळी उशिरापर्यंत भाविक प्रवाशांच्या उपलब्‍धतेनुसार या बसगाड्या उपलब्‍ध राहणार आहेत. जुने सीबीएस बसस्थानकावरून या बसगाड्या सुटतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ST BUS
Nashik Trimbakeshwar News : तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरला जाताय? या वाहनांना 3 दिवस प्रवेशबंदी

‘त्‍या’ मार्गांवर महामार्गावरून सेवा

त्र्यंबकेश्‍वरसाठी जुने सीबीएस येथून बसगाड्या सोडल्‍या जाणार आहेत. त्‍यामुळे या बसस्थानकावरून जिल्‍हांतर्गत मार्गांवर सोडल्‍या जाणाऱ्या बसगाड्या रविवार व सोमवार, असे दोन दिवसांपुरत्या महामार्ग बसस्थानकावरून सोडल्‍या जाणार असल्‍याचे महामंडळातर्फे कळविले आहे.

त्र्यंबकेश्‍वरसाठी उपलब्‍ध जादा बसगाड्या अशा

नाशिकहून (जुने सीबीएस) ----- १८०

अंबोलीहून ------------------ १०

पहिनेहून ------------------- १०

घोटीहून ------------------- १०

खंबाळेहून ----------------- ४०

एकूण ------------------- २५०

ST BUS
Shravan Somvar Upay मनातील इच्छा पूर्ण करायचीय? शंकराच्या पिंडीवर अशा पद्धतीने अर्पण करा बेलाचे पान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com