bharati pawar
bharati pawaresakal

Nashik News : विभागात 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 253 कोटी; राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची माहिती

नाशिक : पंतप्रधान आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन अंतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयात १०० बेडचे सुसज्ज क्रिटिकल केअर रुग्णालय तसेच इंटिग्रेटेड हेल्थ पब्लिक लॅबरोटरी क्रिटिकल केअर हॉस्पिटलसाठी केंद्र शासनाने २५३. ७६ कोटीला मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली. (253 crore for 100 bed hospital in division Minister of State Dr Bharati Pawar information Nashik News)

शंभर टक्के केंद्र पुरस्कृत १५ वा वित्त आयोगातून कळवण तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट व नवीन पेडीयाट्रिक आय.सी.यु.वॉर्ड, अभोणा येथे सुधारित प्रसूती कक्ष, सटाणा तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात पेडीयाट्रीक युनिट, ब्लॉक पब्लिक हेल्थ युनिट, विरगावला नवीन उपकेंद्र,

नामपूर व डांगसौंदाणे येथे सुधारित प्रसूती कक्ष, सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात पेडीयाट्रीक युनिट, चिंचोली येथे नवीन उपकेंद्र, दोडी येथे सुधारित प्रसूती कक्ष, सुरगाण्यात ग्रामीण रुग्णालय, दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात सुधारित प्रसूती कक्ष प्रस्तावित आहेत.

गिरणारे (ता.नाशिक) येथे सुधारित प्रसूती कक्ष बांधकाम, नगर जिल्ह्यात विविध ठिकाणी २१ आरोग्यवर्धिनी केंद्र, जळगाव जिल्ह्यात ११ आरोग्यवर्धिनी केंद्र, नंदूरबार जिल्ह्यात १४ प्राथमिक आरोग्य केंद्र, हेल्थ युनिट,

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा शासकीय रुग्णालयात नवीन पेडीयाट्रिक आय.सी.यु.वॉर्ड व आय. सी. यू.वॉर्ड नूतनीकरण, उपजिल्हा रुग्णालय कळवण, मालेगाव, सिन्नर, येवला, चांदवड व ग्रामीण रुग्णालय इगतपुरी, वणी,

सटाणा येथे प्रत्येकी एक नवीन पेडीयाट्रिक आय.सी.यु.वॉर्ड, नगर जिल्हा शासकीय रुग्णालयात ७८ खाटांचे पी.एन.सी.वॉर्ड, ऑर्थोपेडिक व ट्रामा, सर्जिकल वॉर्ड, अमळनेरला २६ बेडचे फील्ड हॉस्पिटल, धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता व नवजात शिशुदक्षता विभाग दुरुस्तीची कामे प्रस्तावित आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

bharati pawar
CM Cricket Cup 2023 : मुख्यमंत्री क्रिकेट स्पर्धेत पालकमंत्र्यांची फटकेबाजी!

आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग (ICU), आयसोलेशन वॉर्ड/ऑक्सिजन सपोर्टेड बेड, सर्जिकल युनिट यासारख्या सेवांनी सुसज्ज असतील. तसेच लेबर, डिलिव्हरी, रिकव्हरी रूम (एलडीआर) एका नवजात केअर कॉर्नरसह इमेजिंग सुविधा,

आहारविषयक सेवा, इत्यादी तसेच एकात्मिक सार्वजनिक आरोग्य लॅब भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार क्लिनिकल आणि सार्वजनिक आरोग्य निदान चाचण्या एकाच छताखाली अद्ययावत सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्रस्तावित कामे

- कोचरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी निवासस्थान

- निफाड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतिगृहाचे नूतनीकरण

- चांदवड आणि वडनेर भैरव येथे प्रसूतिगृहाचे नूतनीकरण

- नाशिकला २०० बेडचे रुग्णालयात नवीन आय.सी.यु.वॉर्ड

bharati pawar
Stray Dogs Problem : मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने जुने नाशिक परिसर त्रस्त

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com