Stray Dogs Problem : मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने जुने नाशिक परिसर त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

stray dogs

Stray Dogs Problem : मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने जुने नाशिक परिसर त्रस्त

जुने नाशिक : मोकाट कुत्र्यांनी जुने नाशिकमधील काही भागात दहशत पसरवली आहे. त्यातल्या त्यात एक पांढरा रंगाचा कुत्रा रस्त्यावर दहशत माजवीत प्राण्यांना आणि लहान मुलांचा चावा घेत आहे.

बुधवारी (ता.८) त्याने मुलतानपूर येथील दोन बकऱ्यांच्या पायाचा चावा घेतला. तर एक लहान मुलास चावून जखमी केले. (Old Nashik area suffering from terror of stray dogs nashik news)

जुने नाशिक परिसरात मोकाट कुत्र्यांचा दिवसेंदिवस उपद्रव वाढत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस प्रवास करणारे वाहनचालक परिसरातील नागरिक यांना अधिक त्रास जाणवत आहे. फुले मार्केट, कठडा, नानावली, शिवाजी चौक, अमरधाम परिसर या भागात मोकाट कुत्र्यांचा अधिक वावर आहे.

अनेक वेळा दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांच्या अंगावर कुत्रे धावून जात असल्याने अपघात घडत आहे. काही भागात त्यांच्याकडून लहान मुलांना लक्ष करत जखमी करण्यात आले आहे. बुधवारी मुलतानपूर येथे बाहेर चरणाऱ्या दोन बकऱ्यांना मोकाट कुत्र्याने चावा घेतला.

तर एका लहान मुलाला चावून जखमी केले. आणखी एका मुलाच्या अंगावर कुत्रा धावून जात असल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आल्याने त्यांनी अर्धा ओरड करताच कुत्रा पळून गेला. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

जणू त्यांच्यात दहशतच निर्माण झाली आहे. मोकाट कुत्र्यांचा महापालिकेकडून कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

"जुने नाशिक भागात मोकाट कुत्र्यांची संख्या तर वाढलीच आहे. सध्या त्यातील एक पांढरा रंगाचा कुत्रा डोकेदुखी ठरत आहे. प्रत्येकावर धावून जात चावा घेत आहे. महापालिकेकडून त्याला पकडण्यात यावे." - कुतुबुद्दीन शेख, नागरिक

टॅग्स :NashikStray Dogs