CM Cricket Cup 2023 : मुख्यमंत्री क्रिकेट स्पर्धेत पालकमंत्र्यांची फटकेबाजी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Guardian Minister Dada Bhuse enjoying cricket in the Chief Minister's Cup.

CM Cricket Cup 2023 : मुख्यमंत्री क्रिकेट स्पर्धेत पालकमंत्र्यांची फटकेबाजी!

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर मुख्यमंत्री क्रिकेट चषक २०२३ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेच्या दुसऱ्‍या दिवशी गुरुवारी (ता. ९) पालकमंत्री दादा भुसे यांनी स्पर्धास्थळी भेट दिली. (guardian minister dada bhuse batting in CM Cricket Cup 2023 Tournament nashik news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या वेळी पालकमंत्र्यांनादेखील हातात बॅट घेऊन खेळण्याचा मोह आवरला नाही. हातात बॅट घेत जोरदार फटकेबाजी त्यांनी केली. सर्वज्ञ श्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश मस्के यांनी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजन केले आहे.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, जिल्हाप्रमुख अनिल ढिकले, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे, संयोजक संदीप केदारे, बापू खडताळे, डॉ. किरण वाघ आदी उपस्थित होते. स्पर्धेत १६ संघानी सहभाग घेतला आहे.

विजयी संघाला ३ लाख ५६७, उपविजेता संघाला २ लाख ५६७, तृतीय संघाला १ लाख ५६७ तर चतुर्थ संघाला ७५ हजार ५६७ असे बक्षीस देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सर्वोत्कृष्ट फलदांजाला ११ हजार १११ रुपये, सर्वोत्कृष्ट गोलदांजाला ११ हजार १११ रुपये आणि अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच ५ हजार ५५५ रुपये देण्यात येणार आहे. पारितोषिक वितरण रविवारी (ता. १२) खा. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.