
नाशिक : कोरोनाबाधितांमध्ये दोन हजार ९०० ची वाढ
नाशिक : सरत्या वर्षाला निरोप देताना नवीन वर्षाचे नाशिककरांनी जल्लोषात स्वागत केले. मात्र, जानेवारी महिना कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढीच्या दृष्टीने सुरवातीपासून आव्हानात्मक राहिला होता. अशात महिना संपत असताना, शहरी भागात काही प्रमाणात दिलासादायक स्थिती आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक राहात आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह रुग्णसंख्येतील वाढ मंदावली आहे. गेल्या १५ दिवसांत नाशिक महापालिका क्षेत्रातील ॲक्टिव्ह रुग्णांत केवळ दोन हजार ९०० ची भर पडली आहे. मात्र, मृत्यूचे प्रमाण चिंताजनक आहे. १५ दिवसांत २३ मृत्यूंची नोंद झाली आहे.
हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...
कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढही शहरी भागावर केंद्रित असल्याचे आढळले होते. त्यामुळे नाशिक महापालिका क्षेत्रातील स्थिती अवघ्या काही दिवसांत विपरीत झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात पुन्हा परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे सध्या तरी आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. १५ जानेवारीपासून ते रविवार (ता. ३०) या १५ दिवसांच्या कालावधीत नाशिक महापालिका क्षेत्रात २३ हजार ५८७ रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे या कालावधीत २० हजार ६६४ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. दिवसांत २३ बाधितांच्या मृत्यूची नोंद आहे. अशात १५ जानेवारीला नाशिक महापालिका क्षेत्रातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या सात हजार ५३५ होती. त्यात १५ दिवसांत दोन हजार ९०० ची भर पडली असून, सद्यःस्थितीत नाशिक महापालिका क्षेत्रात दहा हजार ४३५ बाधितांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा: "राहुल गांधी हे फेक गांधी, भाजपचं करतंय महात्मा गांधींच स्वप्न पूर्ण"
तपासण्या घटल्या?
दरम्यान, तिसऱ्या लाटेसह काही दिवसांपूर्वी शहरात सर्दी-खोकल्यासह तापाची साथ सुरू असल्याचे बघायला मिळत होते. या साथीच्या आजाराची लक्षणे कोरोनासदृष्य होती. अशात अनेक रुग्णांनी स्वॅब चाचणी न करता थेट उपचार घेतल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच रुग्णसंख्येत घट झाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
Web Title: 2900 Corona Positive Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..