Nashik Accident News: दोन दुचाकींच्या अपघातात 3 जखमी, एक गंभीर

मुंबई-आग्रा महामार्गावर पाडळी शिवारात दोन दुचाकींच्या अपघातात तीन जखमी झाले
acidental vehicle
acidental vehicleesakal

35)पाडळी शिवारात दोन दुचाकी अपघातात तिनं जखमी पैकी एक गंभीर जखमी. (Word Count : 168 CC : 12 Page Baskets: SINTDY1 Locations: -)

VDH23B01786

पाडळी : अपघातग्रस्त दुचाकी.

---

सकाळ वृत्तसेवा

वाडीवऱ्हे, ता. २६ : मुंबई-आग्रा महामार्गावर पाडळी शिवारात दोन दुचाकींच्या अपघातात तीन जखमी झाले. पैकी दोन गंभीर जखमी आहेत. पहिला अपघात सोमवारी (ता. २५) दुपारी साडेतीनला झाला.

नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या दुचाकीला (एमएच १५, जेएन १७२९) सॅमसोनाइट कंपनीच्या गुदामासमोर एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने अपघात झाला. त्यात दुचाकीवर बसलेल्या मनीषा पांडुरंग गायकर (वय ४२), शुभम पांडुरंग गायकर (वय ३०, रा. मालुंजे ता. इगतपुरी) जखमी झाले. (3 injured one critically in two wheeler accident Nashik News)

acidental vehicle
Jalgaon Accident News: सुसाट वेगातील ट्रक दिसताच राखले प्रसंगावधान; दुचाकी दाबली आणि कारचे नुकसान

अपघातानंतर वाहनचालक फरारी झाला. महिलेच्या डोक्यास गंभीर जखमी झाली व एक किरकोळ जखमी झाला आहे. पाडळी फाट्यावर झालेल्या दुचाकी अपघातात एक गंभीर जखमी झाला आहे.

सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या दुचाकी (एमएच १५, डीजे १८६९) चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने चालक अशोक गणेश उबाळे महामार्गावर घसरून पडला. त्याच्या डोक्यास मार लागल्याने गंभीर झाला.

अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाट्यावर महामार्गावरील जगद्‌गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानची रुग्णवाहिका त्वरित अपघातस्थळी पोहोचली व पहिल्या अपघातातील जखमींना घोटीच्या खासगी रुग्णालयात, तर दुसऱ्या अपघातातील जखमींना घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

acidental vehicle
Accident News: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; साईबाबांच्या दर्शनानंतर शिर्डीतून चंद्रपूरला परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com