सिडको- काही महिन्यांपासून सीएनजीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागला असून, याचा गंभीर फटका वाहनचालकांना बसत आहे. विशेषतः रिक्षाचालक व खासगी वाहनधारकांना तासन्तास रांगेत उभं राहावं लागत असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. विल्होळी परिसरातील केवळ एकच सीएनजी पंप कार्यरत असल्यामुळे तेथे वाहनांच्या तब्बल तीन किलोमीटर लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या.