Latest Marathi News | हिरावाडीत मोकाट भटक्या कुत्र्याचा 3 जणांना चावा; बंदोबस्त करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Stray Dog

Nashik News : हिरावाडीत मोकाट भटक्या कुत्र्याचा 3 जणांना चावा; बंदोबस्त करण्याची मागणी

पंचवटी (जि. नाशिक) : हिरावाडीतील शक्तिनगर, बनारसीनगर भागात काही दिवसांपासून भटक्या मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्याचा नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या एक- दोन दिवसांपासून काही भटके श्वान नागरिकांच्या अंगावर भुंकत चावादेखील घेत असल्याच्या घटना घडल्याने नागरिकांत भीती पसरली आहे. परिसरातील भटक्या कुत्र्यांनी तीन जणांना चावा घेतल्याची तक्रार नागरिकांनी केली असून, मनपाच्या संबंधित विभागाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. (3 people bitten by stray dog ​​in Hirawadi Demand for settlement Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : दिव्यांग खेळाडूंची खडतर 'पाठशाळा'

हेही वाचा: SAKAL Exclusive : क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी आता Online होणार!

परिसरातच राहणारी एक महिला आणि युवती दैनंदिन सकाळ व सायंकाळ परिसरातील मोकाट श्वानांना बिस्कीट, अन्न पुरवत असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे आणि त्यातीलच काही श्वान नागरिकांना चावा घेत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. हिरावाडीत दिवसा व रात्री लहान मुलांना पायी रस्त्याने नेताना रस्त्यावर श्वान दिसले, तर कुत्र्यांच्या भीतीने पालकांना लहान मुलांना उचलून घ्यावे लागते.

दोन- तीन दिवसांपासून काही श्वान कॉलनी परिसरातील पायी चालत जाणाऱ्या नागरिकांवर भुंकत अचानक पाठीमागे येऊन चावा घेत असल्याने नागरिकांना श्वान दिसताच हातात दगड घेऊन स्वरक्षण करावे लागत आहे. मनपा संबंधित विभागाने तत्काळ हिरावाडी शक्तिनगर, बनारसीनगर, कमलनगर, भागातील मोकाट श्वान पकडण्याची मोहीम राबवावी, अशी मागणी हिरावाडी परिसरातील नागरिक करत आहेत.

"हिरावाडीत विशेषतः बनारसीनगर भागात मोकाट श्वान वाढले आहे. काही दिवसांपूर्वी एका भटक्या श्वानाने बांधकाम साइटवर खेळणाऱ्या एका लहान मुलावर हल्ला चढविला होता, मात्र त्या वेळी त्याच्या पालकांनी कुत्र्याला पळवून लावले होते. गेल्या दोन तीन दिवसात भटक्या श्वानांनी तीन नागरिकांना चावा घेतल्याची तक्रार असून मनपाने त्वरित मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा." - पूनम मोगरे, माजी नगरसेवक

हेही वाचा: Nashik Crime News : अनैसर्गिककृत्य केल्याचे सांगू नये म्हणून अपहृत बालकाचा निर्घृण खून!

टॅग्स :NashikDogStray Dogs