Crime Update : बॅटऱ्या,बांधकाम साहित्य चोरी प्रकरणी 3 संशयित जेरबंद

nashik crime news
nashik crime newsesakal
Updated on

पंचवटी (जि. नाशिक) : आडगाव शिवारात आलिशान वाहनांच्या बॅटरी, बांधकाम साहित्य, घराच्या खिडकीतून हात टाकून वस्तू चोरी करणाऱ्या तिघांना जेरबंद करण्यास आडगाव गुन्हे शोध पथकास यश मिळाले आहे. या चोरट्यांकडून सुमारे एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्दे माल जप्त केला आहे. (3 suspects jailed in case of theft of batteries construction materials Nashik Crime Update Latest Marathi News)

nashik crime news
अंदरसूलला जुगारअड्ड्यावर छापा; 6 जणांवर गुन्हा दाखल

श्याम राजू कुचेकर, मंगेश बाजीराव दळवी व तेजस प्रभू दराडे (तिघे रा. निलगिरी बाग), अशी संशयिताचे नावे आहेत. गेल्या आठवड्यात आडगाव शिवारातील जयप्रकाश सोपे यांच्या लक्झरी वाहनांच्या बॅटरी व बांधकाम साहित्य चोरी झाले होते. वरिष्ठ निरीक्षक इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी गस्त घालत असताना काही संशयितांची नावे मिळाली.

त्यावरून संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून बॅटरी, बांधकाम साहित्य तसेच वीस ग्रॅम सोन्याची लगड, असा एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक उपनिरीक्षक भास्कर वाढवणे, हवालदार सुरेश नरवडे, विजयकुमार सूर्यवंशी, कंदिलकर, काटकर, सचिन बाहिकर, वैभव परदेशी,देवानंद मोरे यांनी बजाविली आहे.

nashik crime news
Sinnar Flood News : पुरात अडकलेल्यांना काढण्यासाठी सिन्नरकरांची एकजूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Computer Typing Exam
The Saptashrungi–Nanduri Ghat road has been closed for three days as a precaution against landslides and flooding.
What happened in the Sinnar FDA raid?
Samir Bhujbal latest Yeola political news
Marathi News Esakal
www.esakal.com