esakal | इगतपुरी, घोटीत तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस; २४ तासांपासून वीजपुरवठा खंडित
sakal

बोलून बातमी शोधा

Igatpuri Rain

इगतपुरी, घोटीत सलग तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

sakal_logo
By
विजय पगारे

इगतपुरी (जि. नाशिक) : इगतपुरी तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची संततधार कायम असून, पश्चिम पट्यात वाऱ्यासह पाऊस झाल्याने तालुक्यात ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. खंडित वीज पुरवठ्यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. इगतपुरी, घोटी परिसरात बुधवारी (ता.२१) तिसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू होता. रात्रभर पावसाबरोबरच वाऱ्याचाही जोर असल्याने बहुतांश ठिकाणी वीजपुरवठा खंडित होता.

गेल्या चोवीस तासापासून घोटी शहरासह ग्रामीण भागातही वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक व्यावसायिकांना याचा फटका बसला. वाऱ्यामुळे वीजपुरवठा करणारे खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले. चोवीस तासापेक्षा जास्त कालावधी वीजपुरवठा खंडित राहिल्याने बँक, संस्था यांचे काम ठप्प झाले होते.

पावसाची चौफेर फटकेबाजी :

घाटमाथ्यावरील इगतपुरी, शहर व परिसरासह कसारा घाट व पश्चिम पट्ट्यातील भावली, मानवेढे बोरली, पिंपरी सदो नांदगाव सदो, घोटी, देवळे, टाकेघोटी कावनई, कारावाडी, अवळखेड, काराचीवाडी, चिंचलेखैरे, तसेच पूर्व भागातील गोदें, पाडळी देशमुख, अस्वली, मुकणे, वाडीवऱ्हे, सांजेगाव, म्हसुर्ली, आहुर्ली, वैतरणा, माणिकखांब, देवळे खैरगाव, आंबेवाडी इंदोरे, वासाळी, खेड, बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, तळेगाव बलायदुरी, पारदेवी, त्रिंगलवाडी व आदी भागात पावसाने चौफेर फटकेबाजी केली. शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दरम्यान, या मुसळधार पावसामुळे इगतपुरी शहराचे आणि ग्रामीण भागाचे जनजीवन विस्कळित झाले आहे

हेही वाचा: अनुकंपाच्या नियुक्तींसाठी ऑगस्टमध्ये शिक्षण दरबार : बच्चू कडू

सहा मंडळातील बुधवारी (ता.२१) पडलेला पाऊस:

  • इगतपुरी - ९५ मिलिमीटर

  • घोटी - ७२ मिलिमीटर

  • वाडीवऱ्हे - २९ मिलिमीटर

  • नांदगाव बुद्रूक - ३५ मिलिमीटर

  • टाकेद - ०५ . ८० मिलिमीटर

  • धारगाव - ८६ मिलिमीटर

हेही वाचा: स्मार्टफोन हरवाल्यास Gpay, Paytm खाते 'असे' करा ब्लॉक

loading image